नाशिक : शिंदे – फडणवीस सरकारमधील खातेवाटपाच्या मुद्द्यावर मराठी माध्यमांनी अर्थ – सहकार आणि अन्य मलईदार खाती अजितदादांनी खेचून घेतल्याचे “परसेप्शन” तयार केले आहे. अनेक मराठी माध्यमांनी अजित दादांच्या 9 मंत्र्यांना 9 मलईदार खाती वाटून टाकल्याची यादीच जाहीर केली आहे. प्रत्यक्षात तसे खातेवाटप अद्याप जाहीर देखील झालेले नाही. पण मराठी माध्यमांनी पवारनिष्ठ नॅरेटिव्ह तयार करताना अजितदादांनी मलईदार खाती एकनाथ शिंदे यांच्याकडून खेचून घेतल्याच्या बातम्या दिल्या आहेत.Ajit pawar have to work under control of amit Shah and devendra fadnavis
या बातमी अर्थातच अर्धवट आहेत. कारण अजितदादांनी जरी अर्थ – सहकार यांच्यासारखी मलाईदार खाती खेचून घेतली असली तरी त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे राहणार किंबहुना नियंत्रण कोण ठेवणार आहे??, हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे.
अजितदादा उपमुख्यमंत्री असले तरी ते शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात तिसऱ्या क्रमांकाचे नेते राहणार आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते आणि उद्धव ठाकरेंचा प्रशासन चालवण्याची अनुभवहीनता लक्षात घेता अजितदादांचा त्यांच्या खात्यांवर आणि मंत्रिमंडळावर “कंट्रोल” होता. शिंदे – फडणवीस सरकारमध्ये “तशी” परिस्थिती नाही. “तसे” घडण्याची सुताराम शक्यता नाही. कारण एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत कमी शक्तिशाली असले तरी त्यांचे मुख्यमंत्रीपद हेच शक्तिशाली आहे आणि त्यांना मोदी – शाहांचा केंद्रातून आशीर्वाद आहे.
इतकेच नाही तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सरकारवर “संपूर्ण कंट्रोल” आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रशासनावर उत्तम पकड आहेच, पण त्यापलीकडे शिंदे – फडणवीस सरकारचे “संपूर्ण नियंत्रक” म्हणूनही त्यांची जबाबदारी आणि कामगिरी वाखाणण्यासाठी आहे. त्यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री होऊन देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची कुठेही अधिकारहानी झालेली दिसत नाही. उलट अजितदादांना सत्तेत आल्यानंतर या दोघांच्याही नेतृत्वाखाली काम करावे लागत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मराठी माध्यमांनी पवारनिष्ठ नॅरेटिव्ह मधून आतापर्यंत राष्ट्रवादीच इतर पक्षांवर “नियंत्रण” ठेवत असल्याचा परसेप्शन तयार केले आहे. पण ती वस्तुस्थिती नाही.
उलट अजितदादांकडे जरी अर्थ खाते आणि सहकार खाते आले तरी देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण आणि सहकार खात्यासंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे नियंत्रण यांच्याच नेतृत्वाखाली अजितदादांना काम करावे लागणार आहे. राज्याच्या अर्थ खात्यातली “इकॉनोमिक ऑफेन्स विंग” अर्थ मंत्रालयाला नव्हे, तर गृहमंत्रालयाला जोडली आहे. तसेच अजितदादांचे सहकार खात्याचे रिपोर्टिंगच अमित शाह यांच्याकडे असणार आहे.
त्यामुळे अजितदादांना किंवा राष्ट्रवादीला आणि मराठी माध्यमांना वाटते तेवढे हे सोपे काम नाही.
अजितदादा स्वबळावर सत्तेवर आलेले नेते नाहीत. ते भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेचा वाटा मिळवलेले नेते आहेत, हे इथे विसरून चालणार नाही. इतकेच नाहीतर फार मोठ्या सन्मानाने ते भाजपच्या सत्तेत सामील झाले असे नव्हे, तर घोटाळ्यांच्या चौकशीची झकपाक करण्यासाठी ते दाखल झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस मधले नेते उघडपणे सांगतात. त्यामुळे अजितदादांनी मलईदार खाती खेचून घेतली असे मराठी माध्यमांनी कितीही ढोल बडवून सांगितले तरी, अजितदादांची “पॉलिटिकल पोझिशन” ही महाविकास आघाडी मध्ये असलेल्या पोझिशन पेक्षा बळकट नव्हे, तर कमकुवत असेल ही राजकीय वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App