विशेष प्रतिनिधी
पुणे : Ajit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, त्याला उत्तर द्यायलाच मी बांधील आहे, अे नाही. यासोबतच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांचा मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून घेऊ. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात अजित पवार यांनी उपस्थित राहून माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.Ajit Pawar
अजित पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान म्हणून ओळख आहे. त्यांनी सर्वांना दिलेल्या न्यायाचे स्मरण अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे होत राहील.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात दोन गट पडल्याचे म्हटले होते. तसेच मूळ राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला पुन्हा चिन्ह परत मिळेल असंही रोहित पवारांनी म्हटे होते. त्यावर अजित पवार म्हणाले की, आमच्या पक्षात किती गट आहे ते आमचे आम्ही बघू, इतरांनी फुकटचा सल्ला देण्याचे कारण नाही. कोण काय बोलते याच्याशी मला काही देणेघेणे नाही. महाराष्ट्रात कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही प्रश्न विचारेल. त्याला उत्तर द्यायला मी काही बांधिल नाही.
माणिकराव कोकाटे यांबाबत काय आणि कधी निर्णय होणार? याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, काय निर्णय घ्यायचा या संदर्भात कुणाला सांगण्याचं कारण नाही. ज्यावेळेस मी निर्णय घेईन त्यावेळेस जाहीर करेन. आमचे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू, कारण मंत्रिमंडळात कोण असावे, कोण नसावे, कुणाचे खां कुणाकडे असावं हे ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.
धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुन्हा आगमन होईल का असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडेंवर कृषी खात्यासंदर्भात जे आरोप होते त्यामध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. न्यायालयीन चौकशी देखील राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. त्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे मंत्रिपदाबाबत निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील.
लाकडी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे अशा गरिबांसाठी ही योजना आहे. परंतु काहींनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही नोकरदार भगिनी पण होत्या अशीच आमची माहिती आहे. तसेच पुरुषांनी देखील लाभ घेतला असल्याचे बोलले जात आहे. असा कोणी फायदा घेतला असेल तर तो वसुल करण्याच्या दृष्टीने काय पाऊल उचलायची ते उचलू.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App