विशेष प्रतिनिधी
बारामती : ईव्हीएम मशीन मध्ये घोळ असल्याचे सांगून विरोधक रडीचा डाव खेळत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
बारामती येथे बोलताना बारामतीकर यांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानत अजित पवार म्हणाले, बारामती सारखा मतदार देशात सापडणार नाही. लोकसभा होऊन पाच महिने झाले आणि मग बदल झाला. कालपासून बारामतीकर यांच्या शुभेच्छा स्वीकारत आहे.
बारामतीतील बालपणीच्या आठवणी सांगताना अजित पवार म्हणाले, आमराईमध्ये माझं लहानपण गेलंय. लहानपणी गोट्या,विटी दांडू आणि पाकीट पण चांगलंच खेळायचो . आमराई परिसरात काल गेलो असता दत्त जयंती असता निवडणूकपूर्वी दिलेला शब्द खरा केला. दत्त मंदिरचे भूमिपूजन केलंय. भविष्यात मला जर संधी मिळाली तर मी पैसे देईल.
अजित पवार म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणींनी मला वाचवलं. सर्व घटकांना निधी देण्याचा काम आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात केलंय. लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना सत्तेत बसवल. पंतप्रधान नरेंद्र मोदी विचारत होते की एकतर्फी विजय कसा झाला. त्यांना देखील सांगितलं लाडक्या बहिणीनी खूप मतदान केलंय. मी भाजपसोबत गेलो असता सर्व माझ्यासोबत आलेले निवडून आले. बहिणींनी मेव्हण्याचे ऐकलं नाही. आमच्यावर आता जबाबदारी वाढली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App