नाशिक : पार्थ पवारचा घोटाळा, मधल्या मध्ये जय पवारचा पत्ता काटला??, असा सवाल बारामतीतून समोर आला. राज्यातल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यात बारामती नगर परिषदेचाही समावेश राहिला. बारामती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अजित पवारांचा दुसरा मुलगा जय पवार याचे नाव सगळ्यात आधी चर्चेला आले. पण आज अजित पवारांनी त्याचे नाव चर्चेतून कापून टाकले. त्यामुळेच पार्थ पवारचा घोटाळा, मधल्या मध्ये जय पवारचा पत्ता काटला का??, असा सवाल समोर आला. Jai Pawar’
पार्थ पवारच्या अमेडिया कंपनीचा जमीन घोटाळा बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर त्याचे शिंतोडे उडले. फडणवीसांनी पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याची चौकशी लावली, पण विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यातले वेगवेगळे पैलू माध्यमांनी समोर आणले. त्यामुळे शरद पवार यांच्या भूखंडाचा श्रीखंडापासून ते अजित पवारांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची पुन्हा राज्यात चर्चा सुरू झाली. भाजपनेच अजित पवारांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांचे पंख कापण्यासाठी पार्थ पवारचा जमीन घोटाळा बाहेर काढला, अशी चर्चा देखील महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात रंगली.
– पार्थला वाचवायचे असेल तर…
पार्थ पवारला जमीन घोटाळ्यातून वाचवायचे असेल तर अजित पवारांना त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल त्यांना शरद पवार यांच्याबरोबर आतून किंवा बाहेरून जुळवून घेता येणार नाही. त्यांनी तसे करायचा प्रयत्न केला तर पार्थ पवारच्या वेगवेगळ्या जमीन घोटाळ्यांची मालिकाच लावण्यात येईल, असा संदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कृतीतून दिला याचीही चर्चा महाराष्ट्रात जोरात रंगली.
– जय पवार रेस मध्ये नाही
या पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी बारामतीत विविध विकास कामांच्या संदर्भात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतच त्यांना जय पवार संबंधीचा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी अजित पवारांनी जय पवार यांची बारामतीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी फेटाळून लावली. जय पवारला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे करणार अशी चर्चा मी ऐकली, पण तसे काही होणार नाही जय पवार बारामतीच्या नगराध्यक्ष पदाच्या रेस मध्ये नाही असा खुलासा अजित पवारांनी केला. आधीच आपला थोरला मुलगा जमीन घोटाळ्यात अडकलाय त्यात आता धाकट्या मुलाची नगराध्यक्ष पदाच्या चर्चेची भर नको म्हणून अजित पवारांनी जय पवारचा पत्ता परस्पर काटला का??, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App