नाशिक : महायुतीमध्ये भाजपने एकाकी पाडलेल्या अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन डगरींवर पाय ठेवायचे प्रयत्न चालवलेत खरे, पण यामुळेच ते घसरून पडणार नाहीत याची गॅरंटी कोण देणार??, असा सवाल तयार झालाय. Ajit Pawar and Sharad Pawar
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर लढता येणार नाही. आम्ही स्वतंत्रच लढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केले. त्यामुळे अजित पवारांना महायुतीतून एकाकी पडणे भाग पडले. देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शहरांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करायचे जाहीर केले.
या पार्श्वभूमीवर अजितदादांनी वेगळाच खेळ मांडायची तयारी चालविली. त्यांनी म्हणे, सतेज पाटलांचा फोन फिरवला. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबरच काँग्रेसलाही बरोबर घेण्याची तयारी चालविली. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जुनी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी पुनरुज्जीवीत होण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात हे सगळे जर त्यांच्या चर्चेच्याच पातळीवर अजून तरी राहिले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेतले, असे जाहीर केले. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची चर्चा झाल्याचेही अजित पवारांच्या नेत्यांनी सांगितले. परंतु खुद्द अजित पवार मात्र त्या संदर्भात काही बोलले नाहीत.
– भाजपसाठी महत्त्वाचे सवाल
पण अजित पवारांचे राष्ट्रवादीतून आणि काँग्रेस मधून या सगळ्यामुळे समोर आल्या असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप फक्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करून निवडणूक लढवायची शक्यता आहे का??, ते अजित पवारांना काटशह देण्यासाठी दुसरे काहीच करणार नाहीत का??, असे सवाल समोर आले. त्याचबरोबर एकीकडे महायुतीच्या बरोबर सत्तेत राहून दुसरीकडे अजित पवारांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते ते सहन करतील का??, अजित पवारांना वेगळ्या पद्धतीने काटशह दिल्याशिवाय ते थांबतील का??, हे जास्त कळीचे सवाल समोर आले. या सवालांची उत्तरे अर्थातच “नाही” या एका शब्दात देता येतील.
– भाजप काय करेल??
भाजपने अजित पवारांना महायुतीतून एकाकी पाडले तरी भाजप त्यांना इतक्या सहजासहजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी किंवा काँग्रेसशी हातमिळवणी करू देण्याची शक्यता नाही. कोणत्या स्थितीत भाजपला पिंपरी चिंचवड आणि पुणे या दोन्ही महापालिकांमध्ये स्वतःचे वर्चस्व गमावून चालणार नाही. ते या दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता सहजासहजी अजित पवारांच्या हातात किंवा एकूणच जुन्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या हातात जाऊ देण्याची शक्यता नाही. यासाठी भाजपचे नेते वेगवेगळ्या युक्त्या करतील वेगवेगळे हातखंडे आजमावतील. प्रसंगी अजित पवारांचे राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे उमेदवार फोडतील. पण पवार काका पुतणे आणि काँग्रेस यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जुने वर्चस्व प्रस्थापित करू देणार नाहीत कारण भाजपला स्वतःच्या विस्ताराच्या दृष्टीने ते बिलकुल परवडणार नाही.
– अजितदादा लक्ष्मण रेषा ओलांडू शकतील का??
भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी आखून दिलेली लक्ष्मण रेषा पुढे ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये कसेही करून सत्ता हस्तगत करायचा प्रयत्न केला तर भाजप केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेचा पुरेपूर वापर करून अजितदादांना राजकीय धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी त्यांची जुनी प्रकरणे भाजपच्या हाताशी आहेतच पण त्याचबरोबर पार्थ पवारभोवती फास आवळणे भाजपला सहज शक्य आहे आणि ते ते केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यातूनच अजित पवारांना वेसण घालता येईल. भाजप एकवेळ मर्यादित स्वरूपात पवार काका – पुतण्यांना एकत्र येण्याची मुभा देईल. पण जुनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी पुनरुज्जीवित होऊ देणार नाही. कारण त्यांना ते राजकीय दृष्ट्या परवडणार नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App