नाशिक : जसा काका, तसा पुतण्या; दमबाजी करण्यात दोघांची स्पर्धा!! हे चित्र महाराष्ट्राला आज पाहायला मिळाले. आपल्यासाठीच सत्ता आणि आपणच सत्तेसाठी असा अविर्भाव बाळगणाऱ्या पवार कुटुंबातले काका – पुतणे लोकांना दमदाटी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत, याचा प्रत्यय महाराष्ट्राला पुन्हा एकदा आला.
अजितदादांची दमबाजी
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेकायदा मुरूम खनन प्रकरणात हस्तक्षेप करून महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमबाजी केली होती. अंजना कृष्णा यांनी अजितदादांची दमबाजी रेकॉर्ड केल्याने ती व्हायरल झाली. अजितदादा बेकायदा मुरूम खनन करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना वाचविण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमदाटी करतात, असे चित्र महाराष्ट्राला दिसले होते. सुरुवातीला अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी त्यांच्या समर्थनासाठी पुढे आले होते. पण हे प्रकरण फार पेटल्याने शेवटी अजितदादा आणि त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना माघार घ्यावी लागली. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे अजितदादांचे समर्थन केले, तरी आतून त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. राज्याचा उपमुख्यमंत्री एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी करतो हे प्रकरण दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत गेले होते. त्यामुळे अजितदादांना वारंवार खुलासे करून माघार घ्यावी लागली होती. पण या प्रकरणात त्यांची आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पुरती नाचक्की झाली होती.
रोहित पवारांची दमदाटी
पण त्यातून धडा घेतील तर ते अजितदादांचे पुतणे कसले?? त्यामुळे दमबाजी प्रकरणातून धडा न घेता अजितदादांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मध्ये अधिकाऱ्याला दमबाजी केली. त्याचा बाप काढला. खिशातून हात काढ. नीट उभा रहा. लोकांचे प्रश्न सोडवा लोक भडकले तर काय करतील असा सवाल करत तुमच्या बापाचा पैसा नाही. तुम्ही काम करत नाहीत म्हणून लोकं आम्हाला शिव्या देतात. ज्यांनी बेकार काम केले त्यांना वाचवू नका, या शब्दांमध्ये रोहित पवारांनी कर्जत जामखेड मधल्या एका अधिकाऱ्याला जाहीर कार्यक्रमात झापले. रोहित पवारांच्या या दमदाटीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला.
नाकाने सोलले होते कांदे
याच रोहित पवारांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिकाऱ्याला झापल्यानंतर नैतिकतेच्या मुद्द्यावरून मोठा थयथयाट केला होता. सुसंस्कारित महाराष्ट्राचा आव आणला होता. पण आज त्याच रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदार संघात अधिकाऱ्याला नुसते दमबाजी केली नाही, तर त्याचा बाप काढला. त्यामुळे अंजली दमानिया यांनी जसा काका, तसाच पुतण्या, अशा शब्दांमध्ये दोघांचे वाभाडे काढले. किंबहुना त्यांना तसे वाभाडे काढावे लागले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App