नाशिक : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायचे ठरविले, पण त्या सत्काराला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्यामुळे अजितदादांचा तो “महत्वाकांक्षी” कार्यक्रम महाविकास आघाडीने पंक्चर केल्याचे बोलले जात आहे, ते खरेच आहे. कारण अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःच्या “पॉलिटिकल साईज” पेक्षा हा कार्यक्रम जरा जास्तच मोठा घेतला. त्या कार्यक्रमाला शरद पवार ते उद्धव ठाकरे या माजी मुख्यमंत्री यांनी हजर राहून “राजकीय वजन” मिळवून देण्याचे काहीच कारण नव्हते. त्याप्रमाणे त्यांनी गैरहजर राहून अजितदादांचे “राजकीय वजन” जसेच्या तसे म्हणजे कमी असलेलेच कायम ठेवले. Ajit Pawar and Eknath Shinde
पण त्या पलीकडे जाऊन अजित पवारांच्या कार्यक्रमाला हजर राहायला नकार देताना संजय राऊत यांनी फार मोठ्ठा “जावईशोध” लावण्याचा जो प्रयत्न केला, तो प्रत्यक्षात “जावईशोध” नसून ती राजकीय वस्तुस्थितीच असल्याचे दिसून आले. अजित पवारांनी कालच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा बोलून दाखवली. आपण सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो पण अजून मुख्यमंत्री झालो नाही. शेवटी तसा “योग” यावा लागतो. तो अजून आलेला नाही, असे अजित पवार म्हणाले. त्यासाठी त्यांनी ममता बॅनर्जी आणि जयललिता यांच्या मोठ्या राजकीय कर्तृत्वाचा देखील उल्लेख केला. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होईल, असा आशावाद व्यक्त केला. पण हे सगळे वक्तव्य करताना अजित पवार यांची स्वतःची मुख्यमंत्री व्हायची लालसा मात्र सर्वांच्या समोर आल्याशिवाय राहिली नाही.
पण ज्या अजित पवारांनी जयललिता आणि ममता बॅनर्जी यांच्या राजकीय कर्तृत्वाचा उल्लेख केला, तेवढे कर्तृत्व अजित पवार किंवा त्यांच्याच घरातली कुठली महिला दाखवू शकली नाही, हे मात्र अजित पवारांनी उघडपणे कबूल केले नाही. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा विषय कर्तृत्वापेक्षा “योगायोगा” वर ढकलला. Ajit Pawar and Eknath Shinde
Pahalgam terror attack पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना पन्नास लाखांचे अर्थसहाय्य
– संजय राऊतांचा चिमटा
पण संजय राऊत यांनी अजितदादांना चिमटा काढताना अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, असा “जावईशोध” लावला. छगन भुजबळ आणि नारायण राणे हे शिवसेनेत राहिले असते, तर पुन्हा मुख्यमंत्री झाले असते पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. कारण त्या दोघांचे पक्ष अमित शाह चालवतात. त्या दोघांनी आपले पक्ष भाजपमध्ये विलीन केले, तर कदाचित त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा विचार होईल, असे संजय राऊत म्हणाले.
याचा अर्थ अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेच तर ते भाजपच्या पाठिंब्यावर होतील. स्वकर्तृत्वावर होऊ शकणार नाहीत, असेच संजय राऊत यांनी सूचित केले. पण मूळात अजित पवार काय किंवा एकनाथ शिंदे काय, त्यांना मुख्यमंत्री करायची जबाबदारी भाजपची आहे का??, या गंभीर सवालाबद्दल मात्र संजय राऊत काही बोलले नाहीत. एकनाथ शिंदे यांना भाजपने गेल्या अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री केले, पण ज्यावेळी भाजपने विधानसभा निवडणुकीत पुरेसे संख्याबळ मिळविले त्यावेळी भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री केले, यामध्ये फारसे काही वेगळे घडले नाही. ज्याचे संख्याबळ जास्त किंवा ज्याच्याकडे बहुमत त्याचाच मुख्यमंत्री होतो. नुसत्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या पोकळ गप्पा मारून कोणी मुख्यमंत्री होत नाही, हे संजय राऊत यांना कळूनही वळले नाही, पण म्हणून राजकीय वस्तुस्थिती बदलत नाही.
तसेही 2029 नंतर महाराष्ट्रात भाजप स्वबळावर सत्ता आणेल. त्यासाठी राज्यामध्ये पक्ष संघटना वाढवेल. प्रसंगी संघर्ष करेल, असे अमित शाह यांनी यापूर्वीच उघडपणे जाहीर केले आहे. त्यात त्यांनी कुठली लपवाछपवी केली नाही, किंवा कोणाशी आतून किंवा बाहेरून गाठी बांधल्या नाहीत. महाराष्ट्रात आपापले पक्ष वाढवायचा इतरांना जसा अधिकार आहे, तसा तो भाजपलाही आहे, तोच त्यांनी वापरला आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायची जबाबदारी मूळातच भाजपची नाही, ती असलीस तर ती त्यांच्या स्वतःच्या पक्षांची आणि स्वतःच्या राजकीय कर्तृत्वाची आहे. त्यात भाजप किंवा बाकीच्या कुठल्याही पक्षांचा संबंध नाही. त्यामुळे अजित पवार किंवा एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री होणार नसतील, तर त्यांचे स्वतःचे राजकीय कर्तृत्व कमी पडले हे मान्य करावे लागेल. त्यासाठी उगाच भाजप सारख्या पक्षावर दुगाण्या झोडण्यात काही मतलब नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App