पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांची “गेम”; महापालिकेला अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन!!

Punekars

नाशिक : पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांनी केली “गेम”; महापालिकेला तसे करण्याचे अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन, ती वस्तुस्थिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेल्या हमीपत्र नंतर समोर आली.Ajit game while luring Punekars with free bus and metro travel; Mutual promises were made when the Municipal Corporation had no authority!

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादींचे मिळून एक हमीपत्र पुणेकर नागरिकांसाठी जाहीर केले. त्यामध्ये त्यांनी पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाचे आश्वासन दिले. त्यामुळे “अजित पवारांनी गेम फिरवली”, “मोठी खेळी केली”, वगैरे भलामण करणाऱ्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. आता फक्त मतदानच करायचे शिल्लक उरले आहे. अजित पवारांनी पुणे महापालिका जिंकलीच आहे अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी केली. परंतु प्रत्यक्षात अजितदादांनी पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना “गेम” केली. महापालिकाला अधिकारच नसताना परस्पर घोषणा केली हेच राजकीय वास्तव हमी पत्राच्या निमित्ताने समोर आले.



– महापालिकेला तसा अधिकारच नाही

कारण संपूर्ण देशात कुठेच मेट्रो सेवा मोफत नाही. कारण ती सेवा महापालिका प्रशासन चालवतच नाही, तर ती केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून तयार केलेली महा मेट्रो नावाची कंपनी चालवते त्यामुळे मेट्रो संदर्भात कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या महामेट्रो नावाच्या कंपनीला आहे.‌ अर्थातच अंतिमतः राज्य आणि केंद्र सरकार यांना आहे. कुठल्याही महापालिकेला त्या संदर्भात स्वतंत्रपणे किंवा स्वायत्तपणे निर्णय घेण्याचा अधिकार नाही.

– 22 शहरांमध्ये मेट्रो मोफत नाही

देशात 22 शहरांमध्ये मेट्रो चालते. त्यापैकी एकाही शहरात मेट्रो मोफत नाही. तसे करायचे असेल, तर एका शहरापुरती मेट्रो मोफत प्रवास मर्यादित करता येणार नाही. त्याचा मोठा आणि व्यापक निर्णय केंद्र आणि राज्य सरकार याच पातळ्यांवर घ्यावा लागेल. तरीदेखील अजित पवारांनी स्वतःच्या उपमुख्यमंत्री पदाच्या बळावर मोफत मेट्रो प्रवासाचे आश्वासन दिले. जणू काही मेट्रो मोफत करायचा निर्णय एकटे अजित दादाच घेतील आणि तो निर्णय लगेच पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका परिक्षेत्रात लागू होईल, असा आव अजितदादा यांनी आणला. पण या हमीपत्रातून त्यांनी पुणेकरांना गंडविले.

Ajit game while luring Punekars with free bus and metro travel; Mutual promises were made when the Municipal Corporation had no authority!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात