वृत्तसंस्था
मुंबई : महाराष्ट्रात १५ दिवसांची संचारबंदी लागू झाल्यापासून मालिका आणि सिनेमांचं शूटिंग बंद झाले आहे. दुसरीकडे मनोरंजनात नवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी मनोरंजनाचा डबल धमाका घेऊन येत आहे. अजय देवगण यांची निर्मिती असलेला ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा सिनेमा पहिल्यांदाच मराठीतून पहाण्याची संधी प्रेक्षकांना देणार आहे.Ajay Devgn’s ‘Tanhaji’ now a chance for viewers to watch in Marathi on Star Pravah!
तानाजी मालुसरे यांनी जीवाची पर्वा न करता कोंढाणा सर केला. या शौर्याची गाथा ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमातून दाखवली आहे. हा दैदिप्यमान इतिहास मराठीत पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहवर २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता हा सिनेमा मराठीतून प्रेक्षकांना पाहता येईल.
अजय देवगण, काजोल, सैफ अली खान यांच्यासोबतच अजिंक्य देव, शरद केळकर, देवदत्त नागे आणि दिग्दर्शक ओम राऊत अशी अनेक मराठी नावं या सिनेमासोबत जोडली आहेत. कलाकारांच्या उत्तम अभिनयासोबतच दमदार गाणी, अजय-अतुल यांचं काळजाला भिडणारं संगीत आणि डोळे दिपवणारे व्हीएफएक्स हे सारं प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे.
मायबोली मराठीमध्ये हा सिनेमा स्टार प्रवाहवर प्रक्षेपित करताना अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो आहे. प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी आहे. सतीश राजवाडे, कार्यक्रम प्रमुख , स्टार प्रवाह
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App