वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस “एम्स”, आयएनआय सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाले आहेत. (AIIMS INI CET Result 2023)
जानेवारी 2024 सत्रासाठी पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पोर्टन्स कंबाइंड एन्ट्रन्स टेस्ट (INI-CET) साठी उपस्थित असलेले उमेदवार एम्सच्या अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर निकाल तपासू शकता.
एम्स आयएनआयसीईटी परीक्षा 5 नोव्हेंबर 2023 रोजी सीबीटी पद्धतीने घेण्यात आली होती. ऑनलाईन जागा वाटप आणि खुल्या जागा वाटपाची फेरी स्वतंत्रपणे अधिसूचित केली जाईल. अभ्यासक्रम 1 जानेवारी 2024 रोजी सुरू होतील आणि प्रवेशाची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे. निकालासंदर्भातील माहिती, निकाल आणि इतर तपशील पाहण्याकरिता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App