मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.Ahmednagar: Police raid a shop selling beef; 40 kg of beef seized
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : अहमदनगरमधील कोतवाली पोलिसांनी झेंडी गेट परिसरात गोमांस विक्री करणार्या दुकानावर छापा टाकला.दरम्यान याठिकाणी सहा हजार रूपये किंमतीचे 40 किलो गोमांस जप्त केले .पोलीस हवालदार अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुनावर बाबु कुरेशी ऊर्फे मुन्ना (रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
झेंडीगेट परिसरात एक जण गोमांस विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.दरम्यान त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार वाय. ए. भिंगारदिवे, सागर पालवे, ए. पी. इनामदार, एस. यु. गोमसाळे, दीपक रोहकले यांना कारवाई करण्याचे सांगितले. उपनिरीक्षक इंगळे यांच्या पथकाने कारवाई करत गोमांस जप्त केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App