मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याने पुण्यात शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कोंबडीचोर असा आरोप करत कार्यकर्त्यांनी पुण्यातील कार्यालयावर कोंबड्या सोडल्या. Agitation of Shivsena against Narayan Rane in Thane and Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याने पुण्यात शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. कोंबडीचोर असा आरोप करत कार्यकर्त्यांनी पुण्यातील कार्यालयावर कोंबड्या सोडल्या.त्याचबरोबर राणे यांच्या कथित मालकीच्या आर डेक्कन मॉलवर दगडफेक करण्यात आली. दरम्यान ठाण्यातही शिवसेनेने आंदोलन केले.
ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलच्या बाहेर युवा सेनेच्या वतीने हातात कोंबड्या घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी नारायण राणे यांच्या नावाचा मेंटल हॉस्पिटलमध्ये केस पेपर देखील काढण्यात आला असून त्यांच्या उपचारांचा सर्व खर्च शिवसेना उचलेल असा उपरोधिक टोला शिवसेनेने लगावला आहे. राणे यांच्या विरोधात महापौर आणि आणि शिवसैनिक गुन्हे दाखल करण्यासाठी नौपाडा पोलीस ठाण्यात जमा झालेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App