प्रतिनिधी
कराड : सातारा बाजार समितीच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोन राजे काल समोरासमोर भेटले दोन्ही राजांच्या समर्थकांमध्ये जुंपली पोलिसांनी मध्यस्थी करून तो वाद मिटवला तरी दोन्ही बाजूच्या 50 जणांवर गुन्हे दाखल झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज कराडला पोचले फडणवीसांच्या भेटीला दोन्ही राजे पोचले या दोघांचीशीही फडणवीसांनी सुमारे दोन तास चर्चा केली आणि त्यानंतर दोघांचाही वाट फार गंभीर नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. After the dispute between the two kings in Satara, the courtesy of Fadnavis in Karad
बुधवारी (२१ जून) सकाळीच या दोघांमधल्या वादाचं असंच एक रुप साताऱ्याच्या खिंदवाडी गावात पाहायला मिळालं. एका जमिनीच्या तुकड्यावरून दोन्ही नेते आमने – सामने आले. त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला. या वादानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दोन्ही राजेंनी भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीसांना या भेटीचा तपशील विचारला. तसेच दोन्ही राजेंशी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला. यावर उपमुख्यमंत्री म्हणाले, दोघांशीही विविध प्रश्नांवर माझी चर्चा झाली. इथले काही सिंचनाचे प्रश्न आहेत त्यावर चर्चा केली. यासंबंधी त्यांनी मला काही निवेदनं दिली आहेत. तसेच विकासकामांवरही चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दोन्ही राजेंना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. मला असं वाटतं की, अशा गोष्टी कधीकधी होत असतात. परंतु तिथे काहीतरी गंभीर घडतंय असं काही नाही. आता कुठलीही अडचण नाही. फडणवीस यांनी दोन्ही राजेंबरोबर दोन तास चर्चा केली. त्यानंतर उदयनराजेंबरोबर तासभर चर्चा केली. ही चर्चा केवळ विकासकामांबाबत होती, असे फडणवीस यांनी भेटीनंतर स्पष्ट केले.
साताऱ्यात बुधवारी नेमके घडले काय?
साताऱ्यातल्या खिंदवाडी भागात बुधवारी सकाळी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचे समर्थक भिडल्याचं पाहायला मिळालं. निमित्त होतं ते एका कंटेनरचं! शिवेंद्रराजेंकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराच्या उभारणीची तयारी करण्यात आली होती. त्यासाठी रीतसर भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी या जागेवर एक कंटेनर तात्पुरतं कार्यालय म्हणून उभा करण्यात आला होता. पण काही वेळातच सकाळी 9.00 च्या सुमारास उदयनराजेंचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कंटेनर जेसीबीच्या मदतीने उलटा केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूंनी आक्रमकपणे भूमिका मांडण्यात आली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करून जमावाला पांगवले.
या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी विरुद्ध गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर आज दोन्ही राजे कराडमध्ये फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले तेथे फडणवीस यांच्या शिष्टाई नंतर सर्व काही अलबेला असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App