
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांच्या पराभवानंतर संभाजीराजे छत्रपती यांना जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वाघाचा अभंग आठवला आहे. वाघाचे कातडे पांघरल्यावर वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही. असा तुकोबांच्या अभंगाचा दाखला त्यांनी दिला आहे. After the defeat of Shiv Sena’s Sanjay Pawar, Sambhaji Raje remembered Tukob’s tiger abhang
असे आहे संभाजीराजेंचे ट्वीट
छत्रपती संभाजी राजे यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, संभाजीराजेंनी हे ट्वीट केले आहे. वाघासारखे पांघरुण घेतल्यावर आपण वाघासारखे दिसतो, पण दशा अंगी येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा खोटा आव आणणा-यांची लगेचच फजिती होते, अशा आशयाचे ते ट्विट आहे.
वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 11, 2022
– शिवसेनेने संभाजीराजेंना पाठिंबा दिला नाही
संभाजीराजे यांच्या राष्ट्रपती नियुक्ती खासदारकीचा 3 मे रोजी कार्यकाळ संपला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती. महाविकास आघाडीत सहावी जागा शिवसेनेला मिळाल्यामुळे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी संभाजीराजे यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती केली होती. परंतु, संभीजीराजे यांनी शिवसेनेची ही ऑफर स्वीकारली नाही. त्यामुळे सहाव्या जागेवरुन चांगलेच राजकारण सुरु झाले होते. शेवटी शिवसेनेने कोल्हापूर शहर प्रमुख संजय पवार यांना जागेसाठी उमेदवारी दिली.
त्यामुळे स्वाभिमान राखण्यासाठी संभजीराजे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. परंतु आता शिवसेनेचा उमेदवार संजय पवार हे पराभूत झाल्यानंतर, त्यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला.