प्रतिनिधी
पुणे : ड्र्ग्स माफिया ललित पाटील यांच्या नाट्यमय अटकेनंतर अटकेनंतर वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र राजकारणापलीकडे जाऊन फार मोठा गंभीर इशारा दिला आहे. जे काही ब्रीफिंग झाले आहे, ते मी आत्ता सांगत नाही. योग्य वेळेलाच सांगेन, पण आत्ता एवढेच सांगतो, की ललित पाटील काय म्हणतो त्यापेक्षा त्याच्या अटकेनंतर बड्यांचे फार मोठे ड्रग्स nexus उघडकीस येईल, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करून अनेकांच्या खुर्ची खाली बॉम्ब लावला आहे.After the arrest of Lalit Patil, the big drug nexus will come out
ललित पाटीलला आज चेन्नई मधून अटक केली. तो त्यापूर्वी श्रीलंकेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण अटकेनंतर मात्र त्याने कोर्टासमोर आपण स्वतःहून पळून जात नव्हतो, तर पुणे पोलीसच आपल्याला पळवून लावत होते, असा आरोप केला.
ललित पाटीलच्या या धक्कादायक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे आणि शिंदे फडणवीस सरकार मधले मंत्री दादा भुसे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला. दादा भुसे यांच्या आशीर्वादशिवाय ललित पाटील नाशकात राहिलाच कसा??, त्याने 1 किलो सोने खरेदी केलेच कसे??, वगैरे सवाल उपस्थित झाले. त्यामुळे सर्व स्टोरी ललित पाटील त्याचे पळून जाणे आणि पुन्हा पकडले जाणे या भोवती रंगली. दादा भुसेंनी तर आपण स्वतः नार्को टेस्टला तयार असल्याचे सांगून सुषमा अंधारे आणि ठाकरे गटाला प्रतिआव्हान दिले.
पण दरम्यानच्या काळात ललित पाटीलला उद्धव ठाकरे हे शिवबंधन बांधत आहेत आणि त्यामध्ये दादा भुसे दिसत आहेत, असे जुने फोटो व्हायरल झाले.
300 कोटींची ड्रग्स पकडली
सर्व स्टोरी ललित पाटील भोवती फिरल्याने ड्रग्स रॅकेट मधून किती ड्रग्स पकडले गेले वगैरे माहिती झाकोळली गेली, पण मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन 10 ग्रॅम एमडी ड्रग्स पासून सुरू झालेली ही ड्रग्स विरोधी मोहीम तब्बल 150 किलो ड्रग्स जप्त करेपर्यंत पोहोचली आणि एकूण 300 कोटी रुपयांची ड्रग्स पोलिसांनी जप्त केल्याची माहिती दिली. महाराष्ट्र ड्ग्समुक्त करण्याच्या मोहिमेतला हा एक टप्पा असल्याचे फडणवीसांनी पुण्यात सांगितले. त्यामुळे फडणवीसांच्या या वक्तव्यातून ड्रग्स विरोधातली गंभीर कारवाई अधिक अधोरेखित झाली.
ललित पाटीलच्या सनसनाटी वक्तव्यावर बोलताना फडणवीसांनी ललित पाटील काय बोलतो??, त्यापेक्षा या ड्रग्स प्रकरणातून फार मोठे रॅकेट आणि nexus उघड्यावर येणार आहे, असा इशारा देऊन अनेकांच्या खुर्ची खाली बॉम्ब लावला आहे.
ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारे, दादा भुसे, एकनाथ खडसे या नेत्यांची वक्तव्ये जरूर बाहेर आली, पण ती सर्व राजकीय स्वरूपाचे आहेत. त्या पलीकडे जाऊन फडणवीसांनी प्रत्यक्ष कारवाई संदर्भात जे सूचक उद्गार काढले, ते अधिक महत्त्वाचे आहेत. ललित पाटील काय म्हणतो, त्यापेक्षा त्याच्या तपासातून फार मोठे ड्रग्स nexus बाहेर येणार आहे हा इशारा फडणवीसांनी दिला याला महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाच्या फार महत्त्व आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App