विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बिगुल फुंकले असताना वेगवेगळी सर्वेक्षणे बाहेर येत आहेत. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स मी केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला तब्बल 12 जागांचा फायदा, तर भाजपला 10 जागांचे नुकसान दाखविले आहे.After split NCP performances remain the same single digit in loksabha survey
आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर काँग्रेसला 66 जागांवर विजय मिळेल, तर भाजपला 290 जागांवर विजय मिळेल, असे या सर्वेक्षणात दाखविले आहे. याचा अर्थ 2019 च्या तुलनेत भाजपला 13 जागांचे नुकसान तर काँग्रेसला 12 जागांचा फायदा होईल, असे दिसते. कारण 2019 मध्ये काँग्रेसला लोकसभेच्या 54 जागा तर भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या.
संपूर्ण बहुमत मात्र मोदी सरकारला मिळणार असून I.N.D.I.A आघाडीला विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.
या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी भाजपाला 20 जागा मिळण्याची शक्यता सर्वेक्षणात वर्तविण्यात आली आहे. भाजपानंतर सर्वाधिक 11 जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळू शकतील. काँग्रेसला 9, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 4, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 2 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीची बेरीज 6 जागांपेक्षा जास्त जात नाही. त्याउलट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 11 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 अशा 13 जागा म्हणजेच डबल डिजिट जागा शिवसेनेला मिळतील, असे सर्वेक्षणात दाखविले आहे.
याचा अर्थ राष्ट्रवादी फुटली किंवा एकसंध राहिली तरी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत त्या पक्षाला मिळत असलेल्या लोकसभेच्या सिंगल डिजिट जागांमध्ये फारसा फरकच पडला नाही, असा होतो. त्या उलट शिवसेनेत उभी फूट पडून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले असले तरी त्यांच्या गटाच्या शिवसेनेला लोकसभेच्या 11 म्हणजे डबल डिजिट जागा मिळत आहेत हेही या सर्वेक्षणाचे वेगळे वैशिष्ट्य मानले पाहिजे.
मतांच्या टक्केवारीच्या बेरजेतही फुटलेली शिवसेना फुटलेल्या राष्ट्रवादीला भारी पडलेलीच दिसत आहे. कारण फुटलेल्या शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीची बेरीज 16 + 7 = 23 % एवढी भरते, तर फुटलेल्या राष्ट्रवादीची बेरीज 16 + 5 = 21 % एवढी भरते. याचा अर्थ फुटलेली शिवसेना फुटलेल्या राष्ट्रवादी पेक्षा 2 % मते जास्त मिळवते, असा होतो.
मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपाला 32 % , उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 16 %, काँग्रेस 16 %, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 16 %, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 7 %, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 % आणि अन्य पक्षांना 11 % मते मिळू शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
जागांच्या हिशेबात भाजपाच्या 3 जागा कमी होणार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या शिवसेनेला फक्त 2 जागा मिळणार असून 10 जागांचा फटका बसणार आहे. अजित पवारांना 2 जागांचा फायदा, तर काँग्रेसच्या 8 जागा वाढणार आहेत. उद्धव ठाकरेंना 6 जागा जागांचा फायदा, तर शरद पवारांच्या मात्र 4 जागा तशाच राहणार आहेत.
विभागानिहाय कोणाला किती जागा मिळणार?
उत्तर महाराष्ट्र 6 जागा
विदर्भ 10 जागा
मराठवाडा 2 जागा
मुंबई 6 जागा
ठाणे आणि कोकण 7 जागा
पश्चिम महाराष्ट्र 11 जागा
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App