प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी राणे यांनी सपत्नीक ही भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. After Raj Thackeray – Narayan Rane’s meeting at Shivtirtha, a discussion arose
मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसेच्या युतीची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर या राणे आणि ठाकरे भेटीला विशेष महत्त्व आहे. या भेटीत राज ठाकरे आणि नारायण राणे हे शिवतीर्थाच्या गॅलरीत पाहायला मिळाले. नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट वैयक्तिक आहे. यात कौटुंबिक मुद्यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
पण नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईसह 16 महापालिकांच्या महत्त्वाच्या निवडणुका जाहीर होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाजप मनसेशी उघड युती करणार की छुपी युती करून शिवसेना उबाठासह काँग्रेस – राष्ट्रवादीलाही वेगळ्या पद्धतीचे धक्के देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे यांनी सरत्या वर्षात भाजपच्या नेत्यांच्या अनेक भेटीगाठी घेतल्या आहेत. यामध्ये उघडपणे दोन्ही बाजूंनी काहीही सांगितले नाही. पण भाजप आणि मनसे यांच्यात काही महत्त्वपूर्ण टॅक्टिकल अंडरस्टँडिंग आधीच झाले असल्याचीच चर्चा खरी मानण्यासारखी परिस्थिती आहे. आजची नारायण राणे आणि राज ठाकरे यांची भेट हेच नेमके सूचित करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App