विशेष प्रतिनधी
पुणे : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद बोलवून तीन राज्यात मतदान चोरी झाल्याचा आरोप निवडणूक आयोगावर लावला. यामुळे संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापलंय. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु झालाय. अशातच, राहुल गांधींपाठोपाठ आता रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी देखील निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. Rahul Gandhi
राहुल गांधी यांनी लोकसभा अधिवेशनात शिर्डी मतदारसंघात मतदार घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. आता, रोहित पवारांनी देखील निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप केले आहेत. मतदार यादीत बोगस नावं कशाप्रकारे घुसवली जातात, याचं सविस्तर प्रेझेंटेशन राहुल गांधी यांनी कालच केलं. तुम्हाला राज्यात याचा नमुना बघायचा असेल, तर शिरूर विधानसभा मतदारसंघातील काही संशयित मतदारांची शहनिशा करण्याची मागणी उमेदवार अशोक बापू पवार यांनी केली होती. यावर, सदर मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचही निवडणूक आयोगाने मान्य केलं, मात्र त्याची नोंद कशी झाली? असं म्हणत रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.
पुढे, पवार यांनी निवडणूक आयोगाने याबाबत हात झटकले व याचं खापर ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रियेवर फोडल असल्याचही म्हंटल आहे. पण राज्यभरात असे किती बनावट मतदार असतील? याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला. Rahul Gandhi
आता बाळासाहेब थोरातांचा देखील निवडणूक आयोगाला सवाल
राहुल गांधी, रोहित पवार यांच्यानंतर आता संगमनेरमधील कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्षाला जिंकवण्यासाठी जाणूनबुजून अनेक गोष्टी केल्या आहेत. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही जी माहिती मागितली होती ती आम्हाला देण्यात आली नाही. हा लोकशाहीला धोका आहे. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झालेला आहे. परंतु, निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
विखे पाटलांनी दिलं सडेतोड उत्तर
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपांवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता पलटवार केला आहे. “राहुल गांधी आणि कॉंग्रेसचे नेते स्वतःचं अपयश झाकण्यासाठी हे आरोप करत आहेत. तेलंगणात त्यांचे सरकार आले तेव्हा बोगस मतदान झाल्याचा आरोप झाला का? कर्नाटकमधील कॉंग्रेसचे सरकार हे बोगस मतदान मिळाल्याने आले का? कॉंग्रेस ला लोकसभेत मिळालेल्या जागाही त्यांना बोगस मतदानामुळेच मिळाल्या का?” असा थेट सवाल त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App