शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा नवा दावा; महाविकास आघाडीकडे आहे, प्लॅन प्लस…!!

प्रतिनिधी

मुंबई : दिल्लीतल्या बैठकांचा महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. कोणाकडे प्लॅन ए आणि प्लॅन बी असतील, तर आमच्याकडे प्लॅन प्लस आहे, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर केला.after meeting sharad pawar sanjay raut claims MVA has plan plus

संजय राऊतांनी गेल्या तीन दिवसांमध्ये दोनदा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज सायंकाळी त्यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आपल्याकडे प्लॅन प्लस असल्याचा दावा केला.



संजय राऊत म्हणाले, की ‘सूत्र जागी झाली असतील तर त्यांना जागे राहू द्या. त्यांना झोपेची गोळी कधी द्यायची ते आम्ही पाहू. जर कुणी प्लॅन ए आणि प्लॅन बी केला असेल त्या सगळ्यांना मी सांगतो आमच्याकडे प्लॅन प्लस आहे असा टोलाही राऊत यांनी लगावला.

आमदार प्रताप सरनाईक आणि माझी चर्चा झालेली आहे. आत्ताचा मिनिटापूर्वी मी त्यांच्याशी बोललो, ते शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेतच राहणार आहे, असंही राऊत म्हणाले. दिल्लीतली बैठक यांचा इथे परिणाम होत नाही. महाविकास आघाडी सरकार स्वबळावरच आले आहे आणि राजकीय पक्ष स्वबळावर आले आहेत.

परंतु, विजय शिवतारे यांचा काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या विरोधातला लेटरबॉम्ब, राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्यातील वाद या विषयांवर संजय राऊत यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

after meeting sharad pawar sanjay raut claims MVA has plan plus

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात