प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या कायद्याच्या बडग्यापासून आपले सरकार वाचविण्यासाठी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेतली. ते आज सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. पण केजरीवाल आणि पवार यांची भेट झाल्यानंतर सोशल मीडियावर अरविंद केजरीवालांनी केलेले एक जुने ट्विट पुन्हा व्हायरल झाले आहे. अनेकांनी या ट्विटवर केजरीवाल आणि पवारांना प्रश्न विचारले आहेत.After Kejriwal – Pawar meeting, Kejriwal’s old tweet regarding Pawar’s Swiss bank account goes viral!!
केंद्रात यूपीए सरकार सत्तेवर असताना शरद पवार त्यात कृषिमंत्री होते. त्यादरम्यानचे म्हणजे 9 मे 2012 चे केजरीवालांचे हे ट्विट आहे. शरद पवारांच्या स्विस बँक अकाउंटचा नंबर आमच्याकडे आहे. तो आम्ही योग्य वेळ येताच जाहीर करू. पण आम्हाला आश्चर्य वाटते की एवढा मोठा भ्रष्टाचार करणारा माणूस आज तुरुंगात असायला हवा होता, तो बाहेर आहे आणि मोठा नेता बनला आहे, असे केजरीवालांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
त्यानंतर केजरीवाल यांनी 25 मे 2023 रोजी एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी दिल्लीच्या जनतेला त्यांचे हक्क परत मिळवून देण्यासाठी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याकडे समर्थन मागणार आहोत, असे म्हटले आहे. त्यानुसार ते मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये शरद पवारांना भेटले.
या केजरीवाल – पवार भेटीनंतरच केजरीवालांची 2012 आणि 2023 मधली ट्विट एकत्र जोडून अनेकांनी केजरीवाल आणि पवारांना प्रश्न विचारले आहेत. पवारांचे स्विस बँक अकाउंट नंबर जर केजरीवालांना माहिती होते तर ते त्यांनी गेल्या 11 वर्षांत दडवून का ठेवले?? ते जाहीर का केले नाहीत?? केंद्र सरकारने ते अकाउंट नंबर शोधून का काढले नाहीत?? की केजरीवाल्यांना नंतर असा काही “शोध” लागला की पवारांचे ते स्विस बँक मधले अकाउंट नंबर “फेक” होते, त्यामुळे त्यांनी ते जाहीर केले नाहीत आणि 2023 मध्ये केजरीवालांना असा “साक्षात्कार” झाला की पवार हे भारतातल्या लोकशाहीचे सर्वात मोठे रक्षणकर्ते आहेत म्हणून ते पवारांना येऊन भेटले??, असे सवाल अनेकांनी केले आहेत. केजरीवाल “फेक” स्विस अकाउंट “फेक” आणि पवारही “फेक”, असे शरसंधानही अनेकांनी साधले आहे.
स्वतः शरद पवारांनी मात्र या भेटीनंतर आता कोणत्या पक्षाची कोणती भूमिका आहे?, वगैरे मतभेदांवर चर्चा करण्याची ही वेळ नाही. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App