जनतेने बहुमताचे सरकार भाजपला दिले असून पाच राज्यात निवडणुक सुरु असताना १४० दिवस जीवनावश्यक वस्तू किंवा इंधनाचे दर वाढवले गेले नाही. त्यानंतर असा काेणता भूकंप आला की, इंधन दर वाढवून सामान्यांचे खिशातील पैसे सरकार लुटत आहे असा आराेप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी केला आहे. After Five state election over now Day by day central government increase the fuel prices
विशेष प्रतिनिधी
पुणे -देशात महागाई, इंधनाचे दर दरराेज वाढत असून त्यावरुन नागरिकांचे लक्ष्य विचलित करण्यासाठी भाजप वेगवेगळे मुद्दे पुढे आणत आहे. जनतेने बहुमताचे सरकार भाजपला दिले असून पाच राज्यात निवडणुक सुरु असताना १४० दिवस जीवनावश्यक वस्तू किंवा इंधनाचे दर वाढवले गेले नाही. त्यानंतर असा काेणता भूकंप आला की, इंधन दर वाढवून सामान्यांचे खिशातील पैसे सरकार लुटत आहे असा आराेप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी पत्रकारांशी बाेलताना केला. After Five state election over now Day by day central government increase the fuel prices
नाना पटाेले म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर पहाटेचे सरकार ज्यावेळी पडले आणि महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली.त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा साेनिया गांधी यांच्याकडे सरकार बाबतचा प्रस्ताव पाठवला. किमान समान कार्यक्रमाची रुपरेषा त्यावेळी ठरली आणि महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. सरकार आल्यानंतर दाेन वर्ष काेराेनाची लाट आली आणि सरकारने चांगल्याप्रकारे काम केले. काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याने आता किमान समान कार्यक्रमातील विषयांना गती देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे. काेराेनाच्या काळात वेगवेगळया खात्याचा निधी हा आराेग्य विभागाकडे वळवावा लागला. त्यामुळे नाेकर भरती, शेतकऱ्यांचे शेतीपंपचा प्रश्न बाकी राहिलेला आहे.
युपीएच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे याबाबत पटाेले म्हणाले, त्यांच्या पक्षात काेणते ठराव करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, भाजपला पर्याय हा काँग्रेस पक्षच असून युपीएचे नेतृत्व हे काँग्रेसच करणार. त्यामुळे काेणत्या पक्षाने काय निर्णय करावे हा त्यांचा भाग आहे. त्यामुळे त्याबाबत फार प्रतिक्रिया देणे उचित नाही. सरकार मध्ये तीन पक्षांना आर्थिक निधी असमताेल प्रकारे मिळत आहे यासंर्दभात ते म्हणाले, तीन पक्षांचे सरकार झाले की थाेडाफार कमी-जास्त हाेऊन असमताेल हाेणार. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाच वर्षाच्या कारकीर्दीत किती आलबेल हाेते हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या स्वत:च्या मंत्र्यांना घरी पाठविण्याची नामुष्की आली हाेती. सरकार म्हटले की, आमदारात विकासकामाकरिता स्पर्धा हाेणे स्वाभाविक आहे. निधी कमी-जास्त प्रमाणात झाला असेल तर विकास न झालेल्या ठिकाणी विकास हाेणे आवश्यक आहे.
काॅंग्रेस मध्ये सध्या सर्व काही आलबेल नाही असा आराेप भाजप नेते करतात याबाबत ते म्हणाले की, भाजपच्या प्रमाणपत्राची आम्हाला गरज नाही. त्यांच्यावर बाेलण्यासाठी आमच्याकडे अनेक विषय आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मंत्रीमंडळात आहे परंतु त्यांना कितपत अधिकार आहे हे त्यांनी जनतेला येऊन सांगावे. साेनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहे. काँग्रेस आमदारांनी नेतृत्वाला भेटण्यास जाण्याबाबत काही गैर नाही. आमच्या नेत्यांना आमचे लाेकप्रितिनिधी भेटण्यास जातात याचा बागुलबुवा करण्याची विराेधकांना काय गरज आहे हा प्रश्न माझ्यासमाेर निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात काॅंग्रेसला पुन्हा बळकटी मिळावी अशी मागणी करण्यात येणार आहे. लाेकशाहीत न्यायव्यवस्थेवर लाेकांचा विश्वास असताे परंतु मागील काही काळात न्यायव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण हाेऊ लागले ही चिंतेची बाब असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App