अजितदादांच्या एन्ट्री नंतर मुख्यमंत्री बदलाचे पवारनिष्ठ माध्यमांचे “पतंग” शिंदे – बावनकुळे यांनी काटले!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकार मध्ये अजित पवारांची उपमुख्यमंत्री म्हणून एन्ट्री झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थान डळमळीत झाले आहे, असा दावा करून मुख्यमंत्री बदलाचे अनेक पतंग पवारनिष्ठ माध्यमे महाराष्ट्राच्या राजकीय हवेत उडवत होती. पण हे पतंग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटले, इतकेच नाहीतर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील काही पतंग काटून टाकले. After Ajit Dada’s entry, the Chief Minister’s change was called “Kite” by the media loyal to Pawar

शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांचे प्रशासकीय कौशल्य लक्षात घेता ते शिंदे – फडणवीस यांना “जड” जातील. अजितदादा प्रभावी मराठा नेता असल्याने भाजप त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदासाठी तगडा उमेदवार म्हणून पहात आहे. त्यामुळे लवकरच अजितदादांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल, असा दावा अनेक मराठी माध्यमांनी केला. त्यासाठी त्यांनी 11 ऑगस्टची तारीख देखील दिली.

महाराष्ट्राचे राजकारण “पवार” नावाच्या घटकाशिवाय हालत नाही, असा नॅरेटिव्ह या निमित्ताने पवारनिष्ठ मराठी माध्यमांनी चालवला. पण या नॅरेटिव्हला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शिवसेनेच्या 50 आमदारांची बैठक घेऊन छेद दिला. आपण राजीनामा देणारच नाही. तसा देण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. उलट 2024 पर्यंत आपण मुख्यमंत्री आहोतच. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करून आपल्या गटातले आमदारही मंत्री होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आणि अपक्ष आमदारांना दिला. त्याचवेळी अजित पवारांसारखा तगडा मंत्री निधी आडवेल, ही शक्यताही मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली. सगळ्या फायली जर साह्यांसाठी माझ्याकडे येणार आहेत, तर निधी कसा आडवून ठेवता येईल??, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील एकनाथ शिंदे 2024 पर्यंत मुख्यमंत्री राहतील, असा स्पष्ट निर्वाळा दिला. भाजप पक्ष म्हणून ही भूमिका आपण मांडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी देखील याच मुद्द्याला दुजोरा दिला. एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. त्यात कुठेही कमतरता ठेवू नका. विधानसभा निवडणुकीतल्या जागावाटप बाबत तीन पक्षांचे वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील, असा निर्वाळा दिला.

– पवारनिष्ठ नॅरेटिव्ह

पण मराठी माध्यमे पवारनिष्ठ नॅरेटिव्ह वेगवेगळ्या मार्गाने पसरवत राहतात. अजितदादांच्या एन्ट्रीमुळे मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या हे पवारनिष्ठ नॅरेटिव्हचे एक उदाहरण होते. शरद पवार फार मोठे चाणक्य आहेत, असा नॅरेटिव्ह मराठी माध्यमांनी वर्षानुवर्षे चालवला. पण त्यांची चाणक्यगिरी पुतण्यानेच उद्ध्वस्त केली. तसाच अजित पवार हे फार मोठे प्रशासकीय कौशल्य असणारे नेते असल्याचा नॅरेटिव्ह माध्यमे अनेक वर्षे चालवत आहेत.

– मराठी माध्यमे टरकतात

पण प्रशासकीय कौशल्य असणाऱ्या अनेक नेत्यांपैकी अजित पवार हे एक नेते आहेत, देवेंद्र फडणवीसही त्यांच्या पक्षाच्या पाठिंबाच्या बळावर तेवढेच, किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रशासकीय कौशल्य असणारे नेते आहेत. इतकेच नाहीतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद 5 वर्षे यशस्वीरित्या संभाळणारे ते नेते आहेत आणि शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस या दोन घराणेशाही पक्ष फोडून महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना धडा शिकवणारे नेते आहेत, हा नॅरेटिव्ह कबूल करायला मराठी माध्यमे टरकतात हेच यातून दिसून येते!!

After Ajit Dada’s entry, the Chief Minister’s change was called “Kite” by the media loyal to Pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात