स्टिंग केसचा तपास पुणे पाेलीस सीआयडीला देण्याचे विचारात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन उघड करत विरोधकांना जाणूनबुजून गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली.याप्रकरणात ॲड चव्हाण आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यकर्त्यांचा तक्रार अर्ज पुणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. याबाबतचा पुढील तपास सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे. Advocate pravin chavhan office sting operation case invistigate by now CID


विशेष प्रतिनिधी

पुणे : एका स्टिंग ऑपरेशनमधील फुटेजद्वारे विधानसभेत सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि महाविकास आघाडी सरकारवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर वकिल प्रविण चव्हाण यांनी तेजस मोरे आणि आणखी एका व्यक्तीविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर वकिल प्रविण चव्हाण यांच्याविरुध्द भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. यामध्ये भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याविरुध्द वकिल चव्हाण हे कट कारस्थान रचत असल्याचे म्हटले आहे . मात्र, याबाबतचा तपास सीआयडीकडे देण्याचा विचार पुणे पाेलीस करत असून यासंर्दभातील दाेन्ही बाजूचे अर्ज सीआयडीकडे दिले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.



यासंदर्भात गुन्हा दाखल होण्याअगोदरच वकिल प्रविण चव्हाण यांच्याविरोधात शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल झाला हाेता. या सर्व घटनाक्रमात वकिल प्रविण चव्हाण यांनी सरकारी वकिलपदाचा राजीनामा दिला.वकिल प्रविण चव्हाण यांनी मागील आठवड्यातच तेजस मोरे आणि आणखी एका व्यक्तीविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला. त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि गोपनियतेचा भंग झाला असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. हा पेन ड्राईव्ह तेजस मोरेनेच फडणविसांना पुरवला असल्याचा आरोप वकिल प्रविण चव्हाण यांनी केला होता. तर अधिवेशना दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना सरकार खोट्या गुन्हयात अडकवून मोक्का लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर एक पेन ड्राईव्ह सभापतींकडे सादर करत खळबळ माजवून दिली होती.
वकिल प्रविण चव्हाण यांनी तेजस मोरे आणि आणखी एका व्यक्तीविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्य आणि गोपनियतेचा भंग झाला असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.

शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात स्टिंग केस प्रकरणात परस्पर विराेधी तक्रार दाखल झाल्या आहे. यासंर्दभात अद्याप पुणे पाेलीसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. याप्रकरणाचा सीआयडी तपास करत असून त्यांच्याकडे संबंधित अर्ज पुढील चाैकशीकरिता देण्याबाबत विचार सुरु आहे.
– राजेंद्र डहाळे ( अपर पाेलीस आयुक्त, दक्षिण विभाग)

Advocate pravin chavhan office sting operation case invistigate by now CID

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात