विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर तोफ डागत स्टिंग ऑपरेशन व्हिडिओ सादर केल्याने खळबळ उडाली.याप्रकरणी चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळून लावत कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.Advocate pravin chavhan denied that alligation by opposition leader Devendra Fadanvis
विशेष प्रतिनिधी
पुणे -विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून विराेधी पक्षातील नेत्यांना गुन्हयात अडकविण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आराेप केला हाेता. त्यावर चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आराेप फेटाळून लावत, आपल्या खासगी केबीन मध्ये तेजस माेरे याने घडयाळ लावून त्याद्वारे छुपे शुटिंग केल्याचा आराेप केला आहे. औरंगाबाद येथील माेरे याच्या बहीणीकडून सदर संशयास्पद घडयाळ आपल्या केबिन मध्ये आले हाेते आणि काेटयावधी रुपये कमविण्यासाठी माेरेने षडयंत्र रचल्याचा आराेप चव्हाण यांनी पत्रकारांशी बाेलताना केला आहे. Advocate pravin chavhan denied that alligation by opposition leader Devendra Fadanvis
ऍड.चव्हाण म्हणाले, तेजस माेरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्या विराेधात जळगाव येथे खंडणीचा गुन्हा दाखल असून पिंपरीत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. ताे येरवडा कारागृहात असताना त्यास जामीन मिळावा याकरिता त्याचे वडील सुरुवातीला मला भेटले. त्यानंतर मी त्याची केस लढत त्याला जामीन मिळवून दिला. त्यानंतर वेगवेगळया कामाच्या निमित्ताने तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ताे माझ्या कार्यालयात येऊ लागला. त्याने सुरुवातीला मला केबिन मध्ये एसी, स्मार्ट टिव्ही गिफ्ट मध्ये बसवून देताे असे सांगितले परंतु त्यास आपण नकार दिला हाेता. जानेवारी महिन्यात न्यायालयात कामानिमित्त गेलाे असताना, त्याने परस्पर माझ्या केबिन मध्ये राखाडी रंगाचे चाैकाेनी एक घडयाळ खुर्ची समाेरील काचेवर बसवले. मात्र, त्यात इलेक्ट्रिक करंट येत नसल्याने त्याने इलेक्ट्रिशियन आणून त्याची जाेडणी केली. त्यानंतर ही सातत्याने घडयाळ बंद पडत हाेते व त्याची दुरुस्ती ताे करत हाेता.आठ मार्च राेजी सदर घडयाळ घेऊन ताे गेला हाेता.
कायदेशीर कारवाई करणार
छुप्या कॅमेऱ्याबाबत कायदेशीर काेणते तथ्य असेल तर त्यासंर्दभात सरकारने पडताळणी करावी असे सांगत प्रवीण चव्हाण म्हणाले, आपण काेणत्याही चाैकशीला सामाेरे जाण्यासाठी तयार आहे. आपल्यावर करण्यात आलेले आराेप तथ्यहीन असून त्यासंर्दभात पुढील काळात कायदेशीर कारवाई करु. व्हिडिओत हस्तक्षेप करण्यात आला असून त्याची सत्यता तपासली पाहिजे. काेणत्याही राजकीय नेत्यांना गुन्हयात मी अडकविण्याचा प्रश्न नाही. काेणी भ्रष्टाचार केला असेल तर ताे काेणीतरी बाहेर काढणारच त्यात मी असलाे किंवा नसलाे काय काेणताही फरक पडत नाही. पाेलीसांना काेणत्याही गुन्हयाचा ड्राफ्ट मी तयार करुन दिला नसून जळगाव येथील पाेलीस छाप्याची व्यवस्था मी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक संवेदनशील गुन्हयांचे तपास माझ्याकडे असल्याने माझ्या विराेधात षडयंत्र रचून मला दूर केले करतच आराेपी गुन्हयातून बाहेर पडू शकतात असा काही लाेकांचा समज झाला आहे.
माझी राजकीय पार्श्वभूमी नाही
ॲड.चव्हाण म्हणाले, मला राजकारणात जावयाचे नसून काेणत्या पक्षासाेबत माझी बांधलकी नाही. माझी काेणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. येरवडा कारागृहात तेजस माेरे असताना त्याची ‘चाचू’ नावाच्या आराेपीशी ओळख झाली व त्याच्या साेबतीने हा कट रचला गेला आहे. ताे काेणाच्या सांगण्यावरुन रचला गेला, यात अन्य काेण सहभागी आहे याबाबतचे सत्य चाैकशीत समाेर येईल. तेजस माेरे स्वत:ला वाचविण्याकरिता बेछूट आराेप करत आहे. माजी मंत्री अनिल गाेटे हे एका केसच्या अनुषंगाने माझ्या कार्यालयात आले हाेते व पक्षकार या नात्याने त्यांना भेटण्याचा मला अधिकार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App