प्रतिनिधी
अकोला : Prakash Ambedkar महाराष्ट्रातील राजकीय व्यवस्था ही लकवा मारल्यासारखी झाली आहे. पुण्यातील घटनेवर राज्य गृहमंत्री योगेश कदम ( Yogesh Kadam ) यांचे वक्तव्य असंवेदनशील आहे. त्यातून त्यांची मानसिकता दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमसारख्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं असे म्हणत त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी केली आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.Prakash Ambedkar
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले की, योगेश कदम यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणी असंवेदनशील वक्तव्य केले, ते दुर्दैवी आहे. अशा घटनेवर सामान्य जनता शोक व्यक्त करते, दिलगिरी व्यक्त करते. परंतु मंत्री पदावर बसलेली व्यक्ती अशा पद्धतीने वक्तव्य करते. त्यातून पोलिसांना आणि आरोपींना सुद्धा बळ मिळते. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं, हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारावा.
मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बाबरी मशीद आणि शीख दंगल झाली त्यावेळी सामान्य माणसाला इजा झाल्यास त्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी असे प्रावधान त्यात करण्यात आले. हे प्रावधान असताना संवेदनशीलता शासनामध्ये यावी अशी अपेक्षा त्यामध्ये होती. आज ज्या मंत्र्यांना असंवेदनशीलता दाखवावी वाटते त्यांना मंत्रिमंडळात का ठेवावं, असा सवाल देखील ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
ठोस पुरावे किती हे महत्वाचे
सरपंच देशमुख हत्याप्रकरणी दीड हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले गेले. नीरव मोदीच्या संदर्भात असेच आरोपपत्र इंग्लंडच्या कोर्टात दाखल केलं तेव्हा त्यांनी भारतीय पोलिसांना झापले होते. तुम्ही PhD करत आहात की, चौकशी करत आहात ? तेव्हा हे PhD चे डॉक्युमेंट आहे का असा सवाल ॲड. आंबेडकरांनी या वेळी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App