विशेष प्रतिनिधी
मुंबई : सध्या राज्य सरकारकडूनसर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेजात अाहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लोकांना परावलंबी केले जात आहे, हे गुलामीचे लक्षणआहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी केली.
नांदेड दौऱ्यात रविवारी दुपारी ते बोलत होते. ते म्हणाले की, रोजगार,नोकऱ्या देण्याऐवजी लाडकी बहीणसह अन्य योजनांमधून लोकांना परावलंबी केले जात आहे. यामुळे लोकांनी याचे उत्तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत द्यावे. दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे पक्ष ओबीसी किंवा मनोज जरांगे यांनी मांडलेल्या प्रश्नांवर बोलत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने एससी, एसटी संदर्भात दिलेल्या निर्णयामुळे सर्वत्र असंतोष पसरला आहे, असे त्यांनी सांगितले.यामुळे आता जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी जसे प्रत्येक नेत्यांना तुमचा आम्हाला पाठिंबा आहे की नाही, असा जाब विचारला, तसा जाब विचारण्याची वेळ या समुहावर आली आहे.
आएसएस व भाजप हिंसेची जी भाषा वापरत आहे, यातून समाजाचे गुन्हेगारीकरण होत असून यामुळेच अत्याचार वाढत आहेत, असा आरोपही अॅड. आंबेडकर यांनी केला.तर वंचित आघाडी आगामी विधानसभा जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ओबीसी निवडणूक समन्वय समिती मार्फत लढवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App