बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे.Admission tickets for Class X will be available online from today
दहावीची परीक्षा (SSC Exam) 15 मार्चपासून पार पडणार आहे. दरम्यान दहावी परीक्षेसाठी हॉल तिकीट आज18 फेब्रुवारीला दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. हॉल तिकीट बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध केले जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : मार्च 2020 मध्ये भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यामुळं दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) परीक्षांना फटका बसलेला होता.
2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळं रद्द कराव्या लागल्या होत्या. यंदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याची घोषणा बोर्डानं केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावटातून हळू हळू मुक्त होत असताना यावेळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दहावी आणि बारावीची प्रवेशपत्र शाळा आणि महाविद्यालयात देण्यात येत होती. बारावीची प्रवेशपत्र देण्यास यापूर्वी सुरुवात झालेली आहे. दहावीची प्रवेशपत्र (SSC Admit Card) आजपासून देण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारु नये
दहावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून विद्यार्थ्यांना परीक्षेचं हॉलतिकीट परीक्षेचं हॉलतिकीट मिळणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. हॉलतिकीट प्रिंट करताना शाळांनी कोणतेही शुल्क आकारू नये, अशा सूचना बोर्डानं शाळा आणि मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. त्यामुळं आज पासून विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचं हॉलतिकीट उपलब्ध होईल.
दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा
दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्तात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.
दहावी बारावीसाठी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली?
मंडळाकडे दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत. यावर्षीच्या दहावीच्या परीक्षांचं स्वरुप हे वस्तूनिष्ठ, लघूत्तरी आणि दिर्घोत्तरी असं असेल. दहावीसाठी 7 विषय आणि 8 माध्यम असतात त्याच्या 158 प्रश्नपत्रिका असतात.
लेखी परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर
लेखी परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत असेल. कोरोना संसर्गामुळं यावर्षी 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परीक्षा 15 दिवस उशिरानं सुरु करण्यात येणार आहेत. दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळेल. प्रात्यक्षिक परीक्षा ही किमान 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित होणार आहेत. अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षक संबंधित शाळेतीलचं असणार आहेत.
Download करताना…
दहावी बोर्डाचे ऑनलाइन हॉल तिकीट www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर उपलब्ध होणार आहे. दरम्यान ऑनलाइन हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि मुख्याध्यापकांची सही, शिक्का मारून विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. हॉलतिकीट मिळवताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा असल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
कसं कराल डाऊनलोड?
इंटरनेट ब्राऊजरमधून www.mahahsscboard.in या संकेत स्थळावर जा.
त्यांनंतर College login या पर्यायामध्ये जाऊन त्याठिकाणी हॉल तिकीट ऑनलाइन डाउनलोड करु शकता.
दरम्यान संबधित ऑनलाइन हॉल तिकीट सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील उच्च माध्यमिक शाळा त्यासोबत कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. हॉल तिकीटात विषय आणि माध्यम बदला संदर्भात दुरुस्त्या असल्यास उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यावयाच्या असल्याची माहितीही शासनाने दिली आहे. हॉल तिकीटावर फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्ती बाबत उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी त्यांच्या स्तरावर फक्त त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे. हॉल टिकीट विद्यार्थ्यांकडून हरवल्यास संबंधित शाळा महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने ‘द्वितीय प्रत'( डुप्लिकेट)असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App