पुण्यात मनसे नगरसेवकाची कौतुकास्पद कामगिरी ; अवघ्या पाच दिवसांत उभारले ४० ऑक्सिजन बेड्सचं हॉस्पिटल

वृत्तसंस्था

पुणे : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ठाकरे – पवार सरकारची चिंता वाढली आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नाहीत. अशातच मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी केवळ ५ दिवसात पुण्यात ४० ऑक्सिजन बेड्स आणि ४० होम आयसोलेशन बेड्स उभारले आहेत. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. Admirable performance of MNS corporator in Pune; A hospital with 40 oxygen beds was built in just five days



नगरसेवक वसंत मोरे म्हणाले, ५ दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये ४० बेड ऑक्सिजन आणि ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महापालिकेच्या १६८ नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त १० बेड केले असते, तर आज संपूर्ण पुणे शहरात १ हजार ६८० बेड तयार झाले असते. त्याद्वारे पुणेकरांना वाचवू शकलो असतो.

पुण्यातिल परिस्थिती भीषण

दरम्यान, पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढत आहे. त्यामुळे खासगी आणि सरकारी रूग्णालये रूग्णांनी फुल्ल झाली आहेत. अनेक ठिकाणी तर जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर रूग्णांना झोपवत असल्याचे दिसून येत आहे.

Admirable performance of MNS corporator in Pune; A hospital with 40 oxygen beds was built in just five days

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात