Devendra Fadnavis : …तर प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिशील अन् पारदर्शी होणार – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis

ज्या व्यक्तीला जिथे न्याय मिळायला पाहिजे तिथेच तो मिळाला पाहिजे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळा’ संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.Devendra Fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्यवस्थेने, सरकारने किंवा अधिकाऱ्याने नागरिकांचे अधिकार मानले नाहीत तर नागरिकांना दाद मागण्यासाठी या अधिकारांना अधिनियमाद्वारे बांधले पाहिजे. आमदार असताना मी यासंबंधीची मागणी केली होती, तसेच खासगी विधेयकही तयार केले होते. पुढे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यावेळी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिला निर्णय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा घेतला.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत हजारपेक्षा जास्त सेवा अधिसूचित केल्या आहेत. यातील 550 ते 600 सेवा ऑनलाईन दिल्या असून आणखी 300 सेवा ऑनलाईन आणायच्या आहेत. 125 सेवा ऑनलाईन आहेत पण त्या कॉमन पोर्टलवर उपलब्ध नाहीत. त्यासाठी 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. तसे न झाल्यास दर दिवशी प्रत्येक सेवेकरिता 1000 इतका दंड लागू असणार आहे, असे सांगत आपले सरकार पोर्टल अपग्रेड करण्यात येत आहे, यामुळे सेवा अधिक सुलभतेने मिळतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या व्यक्तीला जिथे न्याय मिळायला पाहिजे, तिथेच तो मिळाला पाहिजे, हे या कायद्याचे उद्दिष्ट आहे. तो मिळत नसेल तर दाद मागण्याच्या अधिकाराची व्यवस्था आपण तयार केली आहे. ही व्यवस्था योग्यप्रकारे राबवली तर प्रशासनावरचा ताण कमी होईल. जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन दिल्यामुळे कार्यालयातील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी करता येईल. यासाठी ‘मेटा’सोबतदेखील एक करार करण्यात आला असून आपण संपूर्ण गव्हर्नन्स व्हॉट्सअपवर आणत आहोत. याद्वारे सामान्यातल्या सामान्य व्यक्तीच्या जीवनात ‘ईज ऑफ लिव्हिंग’ आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सेवा हक्क अधिनियमासंदर्भात जनजागृतीसाठी शालेय स्तरावर अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल. माहिती अधिकार कायद्याप्रमाणेच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमदेखील जनतेमध्ये रुजला पाहिजे. याचे ब्रॅण्ड ॲम्बेसिडर झालेले गायक शंकर महादेवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या सॉफ्ट व स्टार पॉवरचा उपयोग करुन हा अधिनियम लोकांपर्यंत पोहोचवता येईल. यामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख, अधिक गतिशील, अधिक पारदर्शी होईल.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Administration will be more people-oriented dynamic and transparent said Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात