सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान मोदीनींही केलं मुंबई मॉडलचे कौतुक, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मॉडलचे कौतुक केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी सरकारची आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे आकडे लपवलेले नाहीत, असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. Aditya Thakare targets BJP

मुंबई आणि राज्यात मृतांचे आकडे लपवले जात आहेत, असा आरोप भाजपने केला होता. याबाबत आदित्य म्हणाले, कोव्हिड नियोजनाबाबत सर्व स्तरांवर मुंबई मॉडेलचे कौतुक झाले आहे. सत्य आहे तेच समोर आणले जात आहे.ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील लाॅकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. दुसऱ्या लाटेसाठी लॉकडाऊन लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यावरून राज्य सरकारवर टिकाही होत होती. त्याबद्दल ठाकरे म्हणाले, ‘कोणाला गंमत वाटते म्हणून लॉकडाऊन लागू करत नाही अथवा ते शिथिल केले जात नाही. दुसरी लाट गंभीर असल्याने लॉकडाऊन करावे लागले. मुंबईला लस मिळाल्यास ६० दिवसांत सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करू शकतो, अशी तयारी केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Aditya Thakare targets BJP

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात