वृत्तसंस्था
मुंबई : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सूरज चव्हाणला खिचडी घोटाळ्याप्रकणी 22 जानेवरीपर्यंत सक्तवसुली संचालनालय अर्थात ED ची कोठडी सुनावण्यात आली आहे, तसेच 22 जानेवारीपर्यंत ED च्या ताब्यात ठेवण्याचे देखील निर्देश देण्यात आलेत. ED ने सूरज चव्हाण यांची 8 दिवसांची कोठडी मागितली होती. Aditya Thackeray’s aide Suraj Chavan in ED custody till January 22 in Khichdi scam
आदित्य ठाकरे यांचा निकटवर्ती सुरज चव्हाणला खिचडी घोटाळ्यात 22 जानेवारीपर्यंत ED कोठडी!!
खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय?
कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. सुरुवातीच्या 4 महिन्यांच्या काळात 4 कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आले होते. सुरज चव्हाण यांनी गरिबांच्या खिचडीत पैसा खाल्ला आणि त्यातून मातोश्रीचा गल्ला भरला असा आरोप झाला होता आता त्याच आरोपांची चौकशी ED करीत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App