सोनू सूदवर 20 कोटींच्या कर चोरीचा आरोप, प्राप्तिकर विभागाचा दावा – परदेशातून बेकायदेशीर निधी मिळाला, ईडीदेखील सुरू करू शकते तपास

Actor Sonu Sood, associates evaded ₹20 crore in tax, says income tax dept

Actor Sonu Sood : कोरोना काळात गरीब आणि मजुरांना मदत करून जगभरात प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद वादात अडकलेला दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह 28 ठिकाणी छापे टाकून 3 दिवसांनी सोनू सूदने 20 कोटींची करचुकवेगिरी केल्याचा दावा केला आहे. या छाप्यानंतर अभिनेता किंवा त्याच्या पीआर टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. Actor Sonu Sood, associates evaded ₹20 crore in tax, says income tax dept


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना काळात गरीब आणि मजुरांना मदत करून जगभरात प्रसिद्ध झालेला अभिनेता सोनू सूद वादात अडकलेला दिसत आहे. प्राप्तिकर विभागाने मुंबई, लखनऊ, कानपूर, जयपूर, दिल्ली आणि गुरुग्रामसह 28 ठिकाणी छापे टाकून 3 दिवसांनी सोनू सूदने 20 कोटींची करचुकवेगिरी केल्याचा दावा केला आहे. या छाप्यानंतर अभिनेता किंवा त्याच्या पीआर टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

प्राप्तिकर विभागानुसार “तपासात सोनू सूदने परदेशी देणगीदारांकडून 21 कोटींचा नॉन-प्रॉफिट निधी गोळा केला, जो अशा प्रकारच्या व्यवहारांना नियंत्रित करणाऱ्या कायद्याचे उल्लंघन आहे.

लखनऊमधील एका कंपनीचे 11 लॉकर्स

प्राप्तिकर विभागाने त्याच्या चॅरिटी ट्रस्टवर परदेशी योगदान कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या या खुलाशानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) येत्या काळात हे प्रकरण दाखल करू शकते.

प्राप्तिकर विभागाने लखनऊमधील एका इन्फ्रा कंपनीवर छापा टाकल्याचे सांगितले आहे. मुंबईतील अभिनेत्याची या कंपनीत भागीदारी आहे आणि या कंपनीने मोठ्या प्रमाणावर प्राप्तिकर टाळला आहे. कंपनीच्या दिल्ली, जयपूर, लखनऊ आणि गुरुग्राम येथील ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि छाप्यांदरम्यान 1 कोटी 8 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. 11 लॉकर्सदेखील आढळले आहेत. या कंपनीच्या 175 कोटी रुपयांच्या व्यवहारावर प्राप्तिकर विभागालाही संशय आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Actor Sonu Sood, associates evaded ₹20 crore in tax, says income tax dept

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात