देश हिंदूराष्ट्र म्हूणन साकार झाल्यास सावरकरांचं स्वप्न पूर्ण होईल, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांचे मोठं विधान

सावरकर डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत आणि ते घराघरात पोहचले पाहिजे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : आपल्या अभिनयासोबतच प्रखर सावरकर वादी विचारवंत म्हणून काम करणारे, आणि भारतासोबत परदेशातही सावरकरांवर सखोल असं व्याख्यान देणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पक्ष हे कायमच आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असतात. स्पष्ट परखड आणि हिंदुत्ववादी विचार ते कायमच आपल्या व्याख्यानातून भाषणातून आणि आपल्या समाज माध्यमातून पोस्ट मधून करत असतात. Actor Sharad pangshi speech on Savarkar.

निपाणी शहरातील गांधी चौकातील व्यंकटेश मंदिरात निपाणी भाग ब्राह्मण सभेच्या वतीने अधिक मासनिमित्त महारुद्र स्वाहाकार या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून शरद पोंक्षे बोलत होते. सावरकर विचारदर्शन” असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रथम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं.



स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच खरे राष्ट्रीयत्व होते, असे मनावर कोरले गेले पाहिजे. देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.५० वर्षांहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर यांची खासकरून काँग्रेस सरकारच्या काळात बदनामी करण्यात आली.

हिंदू धर्मावर आघात करण्याचे राजकारण सुरू आहे, म्हणून सावरकर डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत, असे आवाहनही पोंक्षे यांनी केले. पोंक्षे म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात सावरकरांची बदनामी करण्यात आली. मात्र, सावरकर हा सूर्य कधी मावळला नाही. सावरकरांनी काँग्रेसचे हिंदुत्व स्वीकारले नाही, स्वातंत्र्यलढ्यावेळी काँग्रेसला विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही सावरकरांचा सतत अपमान होत राहिला.केवळ दीड, दोन तासांत सावरकर कळणार नाहीत. त्यासाठी सतत सावरकर वाचत रहावे लागेल. केवळ व्याख्यान ऐकून उपयोग होणार नाही, तर सावरकरांच्या प्रखर विचारांचा घरोघरी प्रचार-प्रसार आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Actor Sharad pangshi speech on Savarkar.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात