प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडी सारख्या तपास संस्थांनी राजकीय सुडापोटी ही कारवाई केली आहे. Action reached Sudapoti, ED villages; Sharad Pawar
गेल्या 5 – 6 वर्षांपर्यंत ईडी नावाची संस्था कोणालाही माहितीही नव्हती. ती काय कारवाई करते याचा कोणाला कल्पनाही नव्हती. पण आता राजकीय सूडाच्या कारवायांमुळे ईडी गावा गावांत पोहोचली आहे, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील कारवाईनंतर राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रात असुरक्षित वाटायला लागले असून अशा कारवायानंतर आपण आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
– मनी लॉन्ड्रिंगची कारवाई; बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक; 30 कोटींचे विनातारण कर्ज
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज मंगळवारी धडक कारवाई करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या संपत्तीवर टाच आणली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. पण ईडीची ही कारवाई नेमकी आहे तरी काय?
ईडीने आज प्रसिद्धीपत्रक काढून या कारवाईची माहिती दिली आहे. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 2017 मध्ये मेसर्स पुष्पक बुलियन्स या पुष्पक ग्रुपच्या एका कंपनीविरोधात ही कारवाई होती. मात्र आज झालेली जप्तीची कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याच्या म्हणजेच श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. वर झाली आहे. या कंपनीच्या रहिवासी सदनिका आहेत. या सदनिका ठाण्यातील निलांबरी गृहप्रकल्पातील आहेत. महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लॉन्ड्रिंग बाबत ही कारवाई आहे.
– 21.46 कोटींची मालमत्ता आधीच जप्त
या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. चंद्रशेखर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी संगनमताने पुष्पक रिएलिटी या पुष्पक ग्रुपमधील कंपनीमधील तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यामार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवले. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर प्रा. लि. या केवळ कागदोपत्री असलेल्या कंपनीमार्फत श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये बिगर तारण कर्ज दिल्याचे दाखवले. पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मदतीने साईबाबा गृहनिर्मिती प्रकल्पात ही अवैध रक्कम गुंतवल्याचा आरोप ईडीच्या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
आता या सर्व नोंदी ईडीचे अधिकारी न्यायालयापुढे ठेवणार आहेत. त्यानंतर श्रीधर पाटणकर तसेच नंदकिशोर चतुर्वेदी, महेश पटेल यांना प्रत्यक्ष चौकशी आणि तपासासाठी बोलवून अटकेची देखील कारवाई होऊ शकते, असे ईडीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App