प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमनंतर राज्यातील मशिदींना सुप्रीम कोर्टानेचे आदेश पाळण्याचे आदेश मुंबई पोलिसांनी दिले होते. पण हे आदेश न पाळल्याने आता मुंबईतील दोन मशिदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Action on two mosques in Mumbai
दोन मशिदींवर कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजांच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुंबईतील दोन मशिदींवर वांद्रे आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच पालन न केल्याचा आरोप या मशिदींवरील विश्वस्तांवर करण्यात आला आहे.
राज ठाकरेंच्या भूमिकेचा परिणाम
या मशिदींवर झालेली कारवाई ही राज ठाकरे यांच्या भूमिकेचाच परिणाम आहे. एका धर्माला एक न्याय आणि दुसरा धर्माला वेगळा न्याय याविरोधातच राज ठाकरे यांनी आपल्या सभेत आवाज उठवला होता. त्यामुळे सरकारला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे सरकार आणि मुंबई पोलिसांचे आभार मानतो, असे मनसेचे पदाधिकारी गजानन काळे यांनी म्हटले आहे.
दुजाभाव नाहीसा झाला
आतापर्यंत गणपती, नवरात्री या हिंदू सणांच्या बाबतीत दुजाभाव करण्यात येऊन, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत होते. मात्र आता राज ठाकरे यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर दोन धर्मांतील तेढ कमी होऊन हा प्रश्न सुटला असल्याचे देखील काळे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App