विशेष प्रतिनिधी
कल्याण – ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाने सेक्स रॅकेटचा परदाफाश केला आहे .कल्याणातील एका हॉटेल मधून एका महिला दलाला अटक केली असून तीन मुलींची सुटका केली आहे .ही महिला कल्याण उल्हासनगर परिसरात सेक्स रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले.Action in unethical human trafficking cases; A female pimp escaped, three girls were released
ठाणे अनैतिक मानवी तस्करी पथकाचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना एक महिला दलाल मुलींकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेत असून कल्याण पश्चिमेकडील लीला रेसिंडंसी नजीक काही मुलींना घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली होती
या माहितीच्या आधारे या पथकाने सापळा रचत बोगस ग्राहक पाठवून या महिलेला ताब्यात घेतले .या महिलेच्या ताब्यातून तीन मुलींची सुटका केली .या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करन्यात आला असून या महिला दलालाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं व तीन मुलींना महिला सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे .
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App