बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजार ४७२ वर पोहचली आहे. तर आतापर्यत ६ हजार ४३१ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. Action against 250 employees yesterday; The number of employees in Badat was 4472
विशेष प्रतिनिधी
मुंबई – गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत.दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होत आहे.त्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
दरम्यान काल (19 जानेवारी) महामंडळाने २५० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून, आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ४ हजार ४७२ वर पोहचली आहे. तर आतापर्यत ६ हजार ४३१ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.
महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, तसेच निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करूनसुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाहीत.त्यामुळे या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन केले. मात्र, तरीसुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची कारवाई जोरदार सुरु आहे.
फक्त २७ हजार कर्मचारी कामावर हजर
सध्या ९२ हजार एसटी कर्मचाऱ्यांपैकी फक्त २७ हजार कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत.दरम्यान उर्वरित ६५ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसटीचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App