प्रतिनिधी
पुणे : Swargate rape case स्वारगेट एसटी स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याची न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. शनिवारी स्वारगेट पोलिसांनी आरोपी गाडे याचा तब्बल ५ तास जबाब नोंद केला. जबाबामध्ये धक्कादायक माहिती समोर आली असून त्याबाबतची वाच्यता संवेदनशील प्रकरणामुळे करता येणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पुण्यातील बंड गार्डन आणि स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी दोन वेळा आरोपी गाडे हा महिलांसोबत छेडछाड करताना सापडला होता. परंतु त्याने दिशाभूल करणारी माहिती देत स्वतःची पोलिसांच्या तावडीतून सुटका केल्याचेही स्पष्ट झाले.Swargate rape case
आरोपीवर यापूर्वीच्या ६ गुन्ह्यापैकी पाच गुन्ह्यामध्ये महिला तक्रारदार असून त्याची महिलांबाबत वृत्ती विकृत आहे, असे दिसून आले आहे. शिरूर पोलिस ठाण्यात सन २०२० मध्ये दाखल असलेल्या एका महिलेच्या गुन्ह्यात आरोपीवर अश्लील कृत्य केल्याने विनयभंग गुन्हादेखील दाखल आहे. आरोपीच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केला असता तो वेगवेगळ्या एसटी स्थानकांवर आणि रेल्वेस्थानकावर सावज हेरण्यासाठी वारंवार फिरला असल्याचे दिसले.
आरोपीला पोलिस गावी तपासासाठी नेणार
दत्तात्रय गाडे हा घटना घडल्यावर स्वारगेट एसटी स्थानकातून दुसऱ्या गाडीने गावी गेला होता. तरुणीची तक्रार आल्यावर स्वारगेट पोलिस त्याचा शोध घेत घरीदेखील गेले. मात्र, त्याची कुणकुण लागल्याने आरोपी तीन दिवस गावातील शेतात पसार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना अथक प्रयत्न करावे लागले. आरोपी पसार असताना नेमके कुठे कुठे फिरला, त्याला कोणी मदत केली का, पुरावा लपवण्यासाठी त्याने काही उद्योग केले आहे का याबाबतची चौकशी करण्यासाठी स्वारगेट पोलिस आरोपीला गुनाट गावी घेऊन जाणार आहे. त्याला गावात विरोध असल्याने गावात बंदोबस्त असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App