विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल रत्नागिरी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आरोपीस 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व 40,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Accused of sexually abusing a girl sentenced to 20 jail Ratnagiri Court
इकबाल इस्माईल असे आरोपीचे नाव आहे. आरोपी कासेवाडी तालुका राजापूर येथील रहिवासी असून, पीडितेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत ही घटना घडली होती. पीडित मुलगी मोलमजुरी करणारी गरीब घरची मुलगी आहे. आरोपी इक्बाल सोबत दोन वर्षांपूर्वी तिची ओळख झाली होती. 23 जानेवारी 2020 रोजी घर सारवण्याच्या बहाण्याने त्याने तिला बोलावून लैंगिक अत्याचार केला आणि ही बातमी कोणास सांगितली तर जिवंत मारून टाकण्याची धमकीही दिली होती.
दुर्दैवाचे दशावतार, पुणे स्टेशनवर बलात्कार झालेल्या मुलीवर मुंबईतही लैगिक अत्याचार झाल्याचे उघड
त्यानंतर 14 फेब्रुवारी 2020 रोजी पीडितेची आई दातांच्या डॉक्टरकडे राजापूरला गेली होती. आईला घरी यायला उशीर झाला म्हणून तिच्या आजोबांनी इक्बाल याच्या फोनवरून आईला फोन करण्यास सांगितले होते. त्यावेळी देखील त्याने तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला. काही काळानंतर तिची तब्येत खराब झाल्याने तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले. त्यावेळी ती चार महिन्यांची प्रेग्नंट आहे असे आढळून आले.
ही बातमी पुढे आल्यानंतर पीडितेने 5 जून 2020 रोजी राजापूर पोलीस ठाण्यामध्ये लैंगिक छळाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी लगेच आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376, 506 व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 2012 (4) व (6) अन्वये गुन्हा दाखल केला. राजापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. एल. मौले यानी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बुधवारी ह्या खटल्याचा निकाल दिला गेला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App