अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अखेर बुकी अनिल जयसिंघानिया पोलिसांच्या जाळ्यात; अनिक्षा आणि अनिल समोरासमोर बसवून होणार चौकशी

वृत्तसंस्था

मुंबई : सुमारे सहा – सात वर्षांपासून फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानिया अखेर अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात गुजरात मध्ये मुंबई पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत अनिल जयसिंघानियाला गुजरात मधून अटक केली आहे. आता अनिल जयसिंघानिया आणि त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानिया यांना समोरासमोर बसवून पोलीस त्यांची चौकशी करणार आहेत. Accused Anil Jaisinghani arrested from Gujarat by Mumbai Crime Branch for allegedly threatening and blackmailing Amruta Fadnavis

बुकी अनिल गेल्या सहा – सात वर्षांपासून फरार होता. त्याच्या विरोधात सात राज्यांमध्ये 16 गुन्हे दाखल आहेत. ते प्रामुख्याने आर्थिक फसवणुकीचे आहेत. अनिल जयसिंघानिया याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्यासाठीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानिया हिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी मैत्री वाढवून त्यांना नंतर ब्लॅकमेल केले. 10 कोटी रुपयांची लाच देण्याचे आमिष दाखवून अनिल जयसिंघानिया याला पोलिसांच्या कचाट्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वतः देवेंद्र फडणवीस आणि पोलीस यांनी वेळीच हस्तक्षेप करून अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेलिंग पासून वाचविले.

दरम्यानच्या काळात अनिल जयसिंघानियाचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चा फोटो व्हायरल झाला. अनिल जयसिंघानियाने 2014 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याचा तो फोटो होता. ही बातमी माध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. अनिल जयसिंघानिया याच्यासारखा फरार बुकी शिवसेनेत प्रवेश करतो आणि उद्धव ठाकरे बरोबर फोटो काढून घेतो, यामुळे अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या होत्या.

आता अनिल जयसिंगाने याला मुंबई पोलिसांनी गुजरात मध्ये अटक केली आहे. त्याला उद्या कोर्टात पेश केले जाणे अपेक्षित आहे. त्याची आणि अनिक्षा जयसिंघानिया हिची त्यांना समोरासमोर बसून पोलीस चौकशी करणार आहेत. यामुळे अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणातले अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

Accused Anil Jaisinghani arrested from Gujarat by Mumbai Crime Branch for allegedly threatening and blackmailing Amruta Fadnavis

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात