विशेष प्रतिनिधी
पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुणे मनपातील सहायक आयुक्त समीर तामखेडे यांना १५ हजारांची लाच घेताना सापळा रचून जागीच अटक केली. कोथरूड क्षेत्रीय कार्यालयात सहायक आयुक्त, कनिष्ठ अभियंता आणि शिपायावर लाच स्वीकारल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली. About bribery to three including the assistant commissioner of the corporation Arrested
कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदार ३१ वर्षीय व्यक्ती असून त्याच्याकडून स्वीकारलेली लाच रक्कम १५,००० हजार रुपये आहे. सचिन चंद्रकांत तामखेडे (३४ वर्षे) अनंत रामभाऊ ठोक (कनिष्ठ अभियंता, वर्ग -३) दत्तात्रय मुरलीधर किडरे ( शिपाई, वर्ग – ४) अशी आरोपींची नावे आहेत.
पंचवीस हजार रूपये लाचखोरांनी मागितले होते. तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी कोथरूड येथील ड्रेनेज व कॉंक्रिटिकरणाच्या कामाचे बील मिळण्यासाठी तामखेडे यांना भेटून मागणी केली होती.
सचिन तामखेडे यांनी तडजोडीअंती १५,००० रूपये लाचेची मागणी केली. त्या लाच मागणीस अनंत ठोक यांनी सहाय्य केले. त्यानुसार काल रोजी सापळा कारवाई दरम्यान दत्तात्रय किंडरे यांनी १५,००० रूपयांची लाच रक्कम स्वीकारलली. त्या तिघांना ताब्यात घेण्यात आले. ला.प्र.वि. पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे हे तपास करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App