Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक शपथपत्रात 16 चुका, उमेदवारी रद्द करण्याची मागणी

Abdul Sattar

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Abdul Sattar सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अब्दुल सत्तार यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात गंभीर प्रकारच्या सोळा चुका असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच सत्तार यांच्या शपथपत्रात मानमत्तांची, वाहनांची, हिऱ्यांच्या दागिण्यांची खोटी माहिती दिल्याचा आरोप देखील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केली आहे.Abdul Sattar



या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल केली असल्याचे शंकरपल्ली यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सत्तार यांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये प्रचंड तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ हे चुकीचे दाखवण्यात आले आहे. तसेच मालमत्तेवर करण्यात आलेल्या बांधकामाच्या गुंतवणुकीची माहिती देखील दाखवण्यात आली नसल्याचे या आरोपात म्हटले आहे. काही मालमत्ताची माहिती शपथ पत्रातून गायब करण्यात आली आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सबाबतही खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उमेदवारी रद्द करण्याची मागणी

2019 विधानसभा निवडणुकीतही सत्तार यांनी शपथपत्रात अनेक गोष्टी लपवून निवडणूक आयोगाची फसवणूक केली होती. यासंदर्भात देखील सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली होती. त्या प्रकरणात देखील न्यायालयाने साताऱ्यांना समन्स बजावले होते. मात्र हे प्रकरण अद्याप सुनावणीसाठी प्रलंबित आहे. असे असताना सत्तारी यांनी पुन्हा एकदा खोटे शपथपत्र दाखल केले आहे. त्यामुळे सत्तार यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Abdul Sattar’s Trouble Rises; 16 mistakes in election affidavit

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात