विशेष प्रतिनिधी
मुंबई : Abdul Rashid नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या कृत्याने राज्य हादरलेले असतानाच आता नवी मुंबई कळंबाेलीतील अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान या भोंदूबाबाचे काळे कारनामे उघड झाले आहेत. या नराधमाने खालापूर येथील फार्महाऊसवर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, दोन धाडसी महिलांच्या तक्रारीनंतर खालापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.Abdul Rashid
अब्दुल रशीद हा अत्यंत गोड बोलून लोकांचा विश्वास संपादन करायचा. तो लोकांना आर्थिक, सामाजिक आणि वैवाहिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवत असे. समस्या सुटत नसल्यास ‘तुमच्यावर कुणीतरी काळी जादू केली आहे’, असे सांगून तो महिलांना घाबरवायचा. काळी जादू उतरवण्याच्या बहाण्याने हा भोंदूबाबा महिलांना खालापूर येथील एका निर्जन फार्महाऊसवर एकट्याने बोलवायचा. मध्यरात्री अघोरी पूजा करण्याच्या नावाखाली महिलांच्या अंगावरील वस्त्रे काढण्यास त्यांना भाग पाडत असे. विरोध करणाऱ्या महिलांना जादूटोण्याने संपवून टाकण्याची किंवा जिवे मारण्याची धमकी देऊन तो त्यांच्यावर बलात्कार करायचा. दरम्यान, या भोंदूबाबाने अशाच प्रकारे आणखी काही महिलांची फसवणूक किंवा त्यांच्यावर अत्याचार केले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बदनामीच्या किंवा जादूटोण्याच्या भीतीने गप्प न बसता, अन्य पीडित महिलांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहन खालापूर पोलिसांनी केले आहे.Abdul Rashid
आतापर्यंत दोन महिलांच्या पोलिसांमध्ये तक्रारी
पोलिस उपअधीक्षक डॉ. विशाल नेहूल यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीवरून अब्दुल रशीद ऊर्फ बाबाजान या भोंदूबाबाला अटक केली असून त्याचा अधिक तपास सुरू आहे. केवळ दोन महिलांनी तक्रार केली असली तरी या नराधमाने अनेक पुरुष आणि महिलांची फसवणूक केल्याचा संशय आहे.
फार्महाऊसवर महिलांना बोलवायचा
कळंबोली येथील सोसायटीत त्याने बस्तान थाटले होते त्याठिकाणी त्याची वाढती गर्दी पाहून रहिवाशांनी त्याला घर सोडण्यास सांगितले होते. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला होता. त्यामुळे खालापूर येथील निर्जनस्थळी असलेल्या फार्महाऊसवर तो महिलांना बोलावत असत.
भोंदूच्या जाळ्यात महिला अडकणे ही चिंतेची बाब
खरात प्रकरणानंतरही भोंदूबाबांच्या जाळ्यात महिला अडकणे ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. अंधश्रद्धा आणि कौटुंबिक संकटांचा फायदा घेऊन हे भोंदू महिलांचे शारीरिक व मानसिक शोषण करतात. शिक्षणाचा प्रसार होऊनही समाज अजूनही अशा छुप्या गुन्हेगारांना ओळखण्यात अपयशी ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App