ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” नाव; तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” नाव निवडणूक आयोगाकडून जाहीर
प्रतिनिधी
मुंबई : अखेर एकाच्या दोन शिवसेना झाल्या. एक शिवसेना चालणार उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना चालणार बाळासाहेबांच्या नावावर!! A Shiv Sena will run in Uddhav’s name; The Shinde group will run in the name of Balasaheb
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” असे नाव दिले असून शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव दिले आहे!! त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला धगधगती मशाल हे चिन्ह बहाल केले आहे. त्याचबरोबर त्रिशूल आणि गदा ही धार्मिक चिन्हे असल्याचे ठरवून ही दोन्ही चिन्हे निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना नाकारली आहेत.
शिंदे गटाला म्हणजे “बाळासाहेबांची शिवसेना” या पक्षाला निवडणूक चिन्हाचे तीन पर्याय देण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत.
आज सायंकाळच्या या निकालामुळे, निवडणूक आयोगाचा अंतिम निकाल येईपर्यंत ठाकरे गट म्हणजे “शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे” या पक्षाला मशाल या चिन्हावर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक लढवावी लागणार आहे, तर शिंदे गटाला कोणतेही धार्मिक चिन्ह वगळून तीन पर्याय देऊन त्यातला एक पर्याय निवडणूक आयोग मान्य करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App