पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर पाऊल, लातूर जिल्ह्यातील दुर्गम नागतीर्थवाडी मोफत वाय-फाय मिळालेले पहिले गाव

विशेष प्रतिनिधी

लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या मार्गावर पहिले पाऊल लातूर जिल्ह्यात पडले आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटरनेटअभावी अडचणींना सामोरे जावे लागत होते. महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील दुर्गम गाव असलेल्या नागतीर्थवाडीने यावर आता मात केली आहे. मोफत वाय-फाय कनेक्शन असलेले पहिले गाव बनले आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेट आणि नेटवर्कच्या समस्येपासून दिलासा मिळाला आहे.Ä remote village in Latur, district of Maharashtra has become the first village to have a free Wi-Fi connection

सुंदर माझे गाव या उपक्रमांतर्गत गावात वाय-फाय बसवण्यात आले आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने पुढाकार घेत ही योजना सुरू केली आहे. तसेच ग्रामपंचायतीने ११ सप्टेंबरपासून सर्व व्यवहार पेपरलेस करण्याचा निर्णय घेतला आहे. वाय-फाय कनेक्शन देताना अनावश्यक साइट्स ब्लॉक केल्या आहेत, असं गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सांगितले.



नागतीर्थवाडी गावाची लोकसंख्या ५५२ आहे. गावातील रहिवासी सरिता यलमाटे यांनी सांगितले की, वायफाय नसल्याने इंटरनेट कनेक्शनसाठी त्यांना पतीकडून हॉटस्पॉट घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता वाय-फाय असल्याने आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डिजिटल इंडिया स्वप्न साकार करण्यासाठी हे पहिले पाऊल आहे. ग्रामस्थांना मोफत इंटरनेट मिळत असल्याने सगळे आनंदी आहेत, असंही सरिता म्हणाल्या.

फ्री वाय-फाय मुळे, आता आम्ही नेटवर्कच्या समस्येशिवाय नियमितपणे आॅनलाईन शिक्षण घेऊ शकतो. इंटरनेटसाठी वडिलांवर अवलंबून राहायची गरज नाही, असे आठवीत शिकणाऱ्या अक्षता शिंगाडेने सांगितले,ग्रामस्थ तुकाराम यलमटे म्हणाले, आमचं गाव आभासी जगात पोहोचलेय असे वाटतेय.

ग्रामपंचायतीने दिलेल्या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. या सुविधांमुळे लोक एकत्र येत आहेत. आमच्या गावातील ७०-८० विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे आणि ते देश-विदेशात काम करत आहेत.याशिवाय गावात १२ मोठे स्पीकर बसवण्यात आले आहेत.

या स्पीकरमधून रोज सकाळी धार्मिक गाणी आणि प्रार्थना वाजवण्यात येतात. रोज सकाळी आणि संध्याकाळी बातम्यांचे बुलेटिन प्रसारित केले जाते. तसेच ग्रामस्थांसाठी काही महत्वाच्या सूचना तर या स्पीकरच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात.

ग्रामस्थांचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपर्यंत वाढवण्यासाठी गावातील पडीक जमिनीवर २२० चिंचेची झाडं लावण्यात आली आहेत. या झाडांपासून भविष्यात ८ ते १० लाखांचं उत्पन्न मिळू शकते. तसेच पाणी फाउंडेशने आयोजित केलेल्या एका स्पर्धेत या गावाने २०१७मध्ये ५ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले होते, असे राऊत म्हणाले. नागतीर्थवाडी हे गाव महाराष्ट्र भाजपचे सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी दत्तक घेतले आहे.

Ä remote village in Latur, district of Maharashtra has become the first village to have a free Wi-Fi connection

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात