विशेष प्रतिनिधी
इंफाल : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला जनता दल युनायटेड चे नितीश कुमार यांचा पाठिंबा आहे. त्यांच्या जनता दलाच्या मणिपूरमधील एका आमदाराने भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. मात्र त्यामुळे देशातच आता सत्ता बदल होईल यामुळे विरोधकांना देशभर उकळ्या फुटत आहेत.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने मणिपूरातील एन बीरेन सिंग यांच्या नेतृत्वात मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यांचे एकमेव आमदार आता विरोधकांच्या पंक्तीत बसतील. या प्रकरणाचा कोणताही एक परिणाम मणिपूर सरकारच्या विकास कामावर होणार नाही. मात्र बिहारमध्ये जेडीयू हा केंद्र आणि मणिपूर सरकारसाठी फायदेशीर असणारा पक्ष आहे.
मणिपूरमधील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेडीयू ने सहा जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर निवडणुकीच्या काही महिन्यांनंतर पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सत्ताधारी पक्षांच्या संख्येमध्ये विजयाची आणखी गोळाबेरीज झाली. ६० सदस्यीयांच्या विधानसभेमध्ये भाजपचे ३७ आमदार असून त्यांना नागा पीपल्स फ्रंटच्या पाच आमदारांचा आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांना बहुमत मिळणे सहज शक्य झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App