विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सेक्टर 19 मधील शाहबाज गाव येथे चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली आहे. पहाटे 4.30 सुमारास ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने इमारत कोसळण्याआधी रहिवाशांनी रस्त्यावर धाव घेतली होती. त्यामुळे मोठी जीविहानी टळली आहे. A major accident occurred due to the collapse of a 4-storey building in Navi Mumbai, a disaster was averted as the residents had already left
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडण्याआठी काही लोकांनी इमारतीतल रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे. इमारत कोसळल्याचीमाहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
बेलापूर परिसरातील शहाबाज गावात 4 मजली रहिवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर एक सलून आहे. शनिवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास सलूनचालकाला अचानक इमारतीत कंपण होत असल्याचे जाणवले. त्याने तातडीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी इमारतीतील तिन्ही मजल्यावर असलेल्या रहिवाशांना तातडीने बाहेर काढले.
काही दिवसांपूर्वी ग्रँट रोड परिसरात इमारत कोसळली
7 दिवसांपूर्वीच मुंबईच्या ग्रँट रोड येथील रेल्वे स्थानकाजवळील स्लेटर रोड येथे रुबिनिसा मंझिल नावाची चार मजली इमारत कोसळली होती. याच इमारतीचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या निवासी इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला. ज्यामध्ये ढिगाऱ्याखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाला. तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App