प्रतिनिधी
मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गटातील लढाईत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवले. त्यामुळे शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. तसेच नुसते शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यायचे आहेत. यात आता ठाकरे गटाने आपले चिन्ह ठरवल्याचे सुतोवाच ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिले आहेत. नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट करत, आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटले आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे हे नवे चिन्ह असल्याचे बोलले जात आहे.A good tiger is needed But will Election Commission accept Thackeray group he symbol
पण ठाकरे गटाने हा आक्रमक वाघ स्वतःचे चिन्ह म्हणून स्वीकारले, तर मला प्रश्न उरतो तो म्हणजे निवडणूक आयोग या चिन्हाला मान्यता देणार का?? निवडणूक आयोगाने मुक्त चिन्हांपैकी एक चिन्ह निवडण्याची मुभा दोन्ही गटांना दिली आहे, हे खरे असले तरी, या चिन्हांमध्ये शस्त्र आणि प्राणी यांचा वापर करता येईल का?? हा मुद्दा आहे. त्यामुळे वाघ, ढाल – तलवार, गदा अशा स्वरूपाची चिन्हे निवडणूक आयोग देईल का??, हाही प्रश्न आहे. शिवसेनेच्या नव्या चिन्हाचे उत्तर उद्या 10 ऑक्टोबर निवडणूक आयोगाच्या निकालातून मिळणार आहे.
pic.twitter.com/i5WRkwgAqn — Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 8, 2022
pic.twitter.com/i5WRkwgAqn
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 8, 2022
नार्वेकरांचे सूचक ट्विट
ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी एक सूचक ट्विट केले आहे. आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर, नार्वेकरांनी आक्रमक वाघाचा एक फोटो ट्विट केला आहे. आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या कॅप्शनचीदेखील सध्या चर्चा होत आहे. आमचे चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे मिलिंद नार्वेकरांना या ट्विटमधून सूचित केले आहे. पण अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या हाती आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App