सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या बोगीतून सिमेंट पोती उतरून घेत असताना अचानक उजव्या बाजूला सिमेंट पोत्यांसह ही बोगी उलटली.A freight train overturned at Kolhapur marketyard, seriously injuring six laborers; Admitted to a private hospital for treatment
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर मधील मार्केट यार्ड येथे दुपारी सिमेंटच्या गोण्या उतरविताना रेल्वे मालगाडीचा एक डबा उलटला आहे.यामध्ये सहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत.यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.सिमेंट वाहतूक करणाऱ्या मालवाहू रेल्वेच्या बोगीतून सिमेंट पोती उतरून घेत असताना अचानक उजव्या बाजूला सिमेंट पोत्यांसह ही बोगी उलटली.
बोगीखाली अडकलेल्या कामगारांना युद्धपातळीवर बाहेर काढण्यात आले असून, तातडीने उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, संकेत गोसावी, पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
जखमी मजुरांची नावे
सुरेश पांडुरंग साधुगडे (४२), सिराज शब्बीर आदल खान (३०), पांडू पंडित गेंड (३५), सनाउल्ला उल्लामन शेख (४१), सादिक शब्बीर शेख (४५), मुजाहिदीन इम्तियाज मुजावर (४५) अशी जखमींची नावे आहेत.हे सर्व मजून विक्रमनगर, कोल्हापूरमध्ये राहत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App