राज्यात ‘ग्रीन स्टील’मध्ये ₹80,962 कोटींच्या गुंतवणुकीतून 90,300 रोजगार निर्मिती सुनिश्चित; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

CM Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे ‘एआयआयएफए स्टीलेक्स 2025 – अ स्टील महाकुंभ’ चे उदघाटन संपन्न झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्टील क्षेत्राच्या प्रगतीसोबत ग्रीन स्टील हे महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने पॅरिस करारातील ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कपात आणि एनर्जी ट्रांजिशन उद्दिष्टे वेळेआधी पूर्ण केली आहेत. आता ग्रीन स्टीलच्या जागतिक बाजारपेठेत वर्चस्व निर्माण करण्याचा निर्धार महाराष्ट्राने केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले :

– जेथे 2023मध्ये महाराष्ट्राच्या उर्जेमध्ये केवळ 13% अक्षय ऊर्जेचा समावेश होता, आज तो 25% वर असून 2030 पर्यंत अक्षय ऊर्जेचा समावे सुमारे 58% पर्यंत पोहोचेल.

– उद्योगांसाठी देखील वीजेच्या दरात घट होणार असून 2025 ते 2030 दरम्यान वीज दरात सुमारे 10% कपात अपेक्षित आहे.

– गडचिरोली आता माओवादाच्या छायेतून बाहेर येऊन देशाची ‘नवी स्टील सिटी’ बनत आहे.

– गडचिरोलीत ग्रीन स्टीलसाठी मजबूत इकोसिस्टीम उभारण्यात येत असून, 5 कोटी झाडे लावण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

– पंप स्टोरेजच्या माध्यमातून 1 लाख मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारून महाराष्ट्र देशाचे पॉवर हाऊस बनेल.



 

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी महाराष्ट्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस हे केवळ मुंबईच नव्हे तर गडचिरोलीसारख्या भागातही पायाभूत सुविधा सुधारत आहेत. महाराष्ट्रातील विकास पाहून बंगलोरमधील उद्योजकही कौतुक करत आहेत. पीएम-कुसुम योजनेअंतर्गत राज्याला ₹3500 कोटींचे अनुदान मिळाले असून 2030 पर्यंत 5 लाख मेट्रिक टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमतेचे लक्ष्य निश्चित केले आहे. पुणे हायड्रोजन व्हॅली इनोव्हेशन क्लस्टरलाही केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून सर्व परवानग्या राज्य सरकारने तत्परतेने दिल्या आहेत.

यावेळी महाराष्ट्र शासन आणि स्टील व सहाय्यक उद्योगासंबंधित कंपन्यांसमवेत 9 सामंजस्य करार करण्यात आले. या करारांद्वारे एकूण ₹80,962 कोटींची गुंतवणूक होणार असून, 90,300 रोजगार संधी निर्माण होणार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यानिमित्त स्पष्ट केले की, महाराष्ट्राला केवळ स्टील क्षेत्राचे नाही तर ग्रीन स्टील क्षेत्राचेही नेतृत्व करायचे आहे. येत्या काळात देशाच्या ग्रीन स्टील निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल आणि शासन या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

या महाकुंभासाठी आयोजकांचे अभिनंदन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या ग्रीन स्टील मिशनच्या प्रवासात महाराष्ट्र एक अग्रगण्य भागीदार राहील, असे नमूद केले. यावेळी मंत्री उदय सामंत व इतर मान्यवर उपस्थित होते.

90,300 jobs will be created through investment of ₹80,962 crore in ‘Green Steel’ in the state; CM Fadnavis assures

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात